Gondia district : गोंदिया जिल्हयाच्या गोरेगाव येथील तहसील कार्यालयात लाचलुचपत विभागाने 7 मे रोजी कारवाई केली होती. तहसीलदार किसन भदाने, नायब तहसीलदार नागपुरे व संगणक संचालक राजेंद्र गणवीर या तिघांना अटक केली. न्यायालयाने 11 मे पर्यंत पोलिस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे तिन्ही आरोपींची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
तिन्ही आरोपींकडून जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला. न्यायालयाने तहसीलदार भदाने यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांचा भंडारा येथील कारागृहातील मुक्काम वाढला आहे. तर उर्वरित दोन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला.
1 लाखाची लाच मागितल्या प्रकरणी तहसीलदार भदानेसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. मुख्य आरोपी तहसीलदार यांच्या विरुद्ध ठाणे जिल्ह्यात तहसीलदार पदावर कार्यरत असतांना 10 लाखाची लाच स्वीकारताना कारवाई करण्यात आली होती. हे प्रकरण अद्यापही न्याय प्रविष्ठ आहे. या प्रकरणामुळे आज गोंदिया जिल्हा न्यायालयाने तहसीलादर भदाने यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
Buldhana Crime : पोलिसांची बनावट ओळखपत्रे तयार करणाऱ्या दोघांना अटक
दोन्ही आरोपींची कारागृहातून सुटका
दरम्यान लाच स्वीकारली नसली तरी लाच मागण्याच्या आरोपाखाली तहसीलादर भदाने, नायब तहसीलदार नागपुरे व संगणक संचालक राजेंद्र गणवीर या तिघांविरुद्ध गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला. तिन्ही आरोपींना अटक झाली. न्यायालयाने नायब तहसीलादर नागपुरे व संगणक संचालक राजेंद्र गणवीर या दोघांना जामीन मिळाल्यामुळे दोन्ही आरोपींची कारागृहातून सुटका झाली आहे.