Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीणीची लूट सुरू असल्याचा प्रकार अकोल्यात उघडकीस आला होता. तलाठी महिलांकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या संदर्भात अकोला जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी महिलांकडून पैसे घेणाऱ्या तलाठ्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
अकोला तहसीलदारांनी तलाठ्याची चौकशीकरीत चौकशीअंती या तलाठ्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. राजेश शेळके असे या निलंबित केलेल्या तलाठीचं नाव आहे. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी या निलंबनाचे आदेश काढले आहे.
कार्यालयासमोर मोठी गर्दी
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात महिलांसाठी एक महत्वाची योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना 1 जुलैपासून सुरू केली आहे. योजनेसाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र असून, यासाठी 1 जुलैपासून तलाठी कार्यालय तसेच शहरी भागात तहसील कार्यालयात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Akola News : मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणींकडून’ पैसे उकळण्याचा प्रकार!
अकोला शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्यानंतर राज्यात या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला तलाठी कार्यालयासमोर मोठी गर्दी करत आहेत.
योजनेचे अर्ज भरताना महिलांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. अकोल्यातल्या मोठी उमरी भागातील तलाठी कार्यालयातील हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला अपेक्षित असून, उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी पटवारीचा दाखला देखील तितकाच महत्वाचा असतो.
Maratha Reservation : मराठा संघटना आक्रमक; जरांगेंना झेड ‘प्लस सिक्युरिटी’ द्यावी..
त्यासाठी अकोल्यातल्या मोठी उमरी भागातल्या कार्यालयावर महिलांची प्रचंड गर्दी होती. या दरम्यान राजेश शेळके नामक तलाठी चक्क पटवारीचा दाखला देण्यासाठी महिलांकडून 30 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत शुल्क आकारत असल्याचे निदर्शनास आले होते. आता अमरावती पाठोपाठ अकोल्यात देखील तलाठी पैसे घेतानाचा हा व्हिडिओ समोर आला होता, त्यानंतर तलाठी राजेश शेळके यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे, या आधीही तलाठी शेळके यांच्यावर एसीबीने कारवाई केली होती. त्यामुळे अनेक भागात लाडकी बहीण योजनेखाली महिलांची लूट सुरू असल्याचं सर्रासपणे दिसून येत आहे.