महाराष्ट्र

Swami Govind Dev Giri Maharaj : शिवाजी महाराज ईडीप्रमाणे वसुली करायचे!

Shivaji Maharaj : स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचे पुन्हा वादग्रस्त विधान

ED : छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात रामजन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या राजवटीत ईडीप्रमाणे सक्तिची वसुली करायचे, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. त्यांच्या विधानामुळे मोठं वादळ उठलं आहे. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकोट प्रकरण ताजं असताना महाराजांनी हे विधान केल्यामुळे भाजपसाठी अडचणीचा विषय ठरला आहे.

वादग्रस्त विधान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. काही नेते महाराजांनी सुरत लुटल्याचे सांगत आहेत तर काही महाराजांनी खंडणी मागितल्याचा दावा करत आहेत. दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. शिवाजी महाराजांनी ईडीप्रमाणे खंडणी मागितल्याचा दावा त्यांनी केला आहे. या विधानामुळे शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीचा वाद आणखी वाढत जाणार, अशी चर्चा सुरू आहे.

अयोध्येतील राममंदिर उद्घाटनाच्या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. त्यावेळी विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती, हे महत्त्वाचे.

Kalicharan Maharaj : हा तर नरेंद्र मोदी यांचा मोठेपणा!

काय म्हणाले गोविंददेव गिरी महाराज?

स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण राज्य हिंदूंचं आहे असे मानून कार्य करीत होते. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्या वेळी महाराज आर्थिक संकटात सापडले होते. त्यावर कोणताही उपाय दिसत नव्हता. तेव्हा आज ईडी ज्या पद्धतीने वसुली करीत आहे, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज देखील त्यावेळी लोकांकडून सक्तीने वसुली करायचे. हिंदवी स्वराज्यासाठी भरावा लागणारा कर महाराजांनी जबरदस्तीने वसुल केला.’

काँग्रेसची शिकवण

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांनी सुरत लुटले नाही, असे म्हटले होते. ते म्हणाले, ‘शिवाजी महाराजांनी सुरत लुटले हे काँग्रेसने आम्हाला इतिहासात शिकवले. पण महाराजांनी सुरत लुटली नाही. त्यांनी केवळ हल्ला करून त्यांच्याकडून स्वराज्याचा खजिना हिसकावून घेतला होता. पण, सुरत कधीच लुटली गेली नाही. मात्र, महाराज सुरतेला केवळ सर्वसामान्यांची लूट करण्यासाठी गेले होते, असाच इतिहास आम्हाला नेहमी शिकवला जात होता.’

जयंत पाटील यांची टीका

फडणवीसांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, त्यामुळे ते दरोडेखोर होत नाहीत. नादिरशहाने लूटमार केली होती. महाराजांनी हे केले नाही. महाराजांनी यादी तयार केली. पारेख कुटुंबातील कोणीतरी मरण पावले होते. महाराजांनी सैनिकांना तेथे न जाण्यास सांगितले. त्यांनी यापूर्वी सुरत येथे नोटीस पाठवून खंडणीची मागणी केली होती. त्या नंतर सुरत लुटण्याचे ठरले.’

error: Content is protected !!