महाराष्ट्र

Women’s safety : बदलापूर प्रकरण ताजे असतानाच यवतमाळात..

Missing Case : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन तरुणीचा मृत्यू

Crime : मुंबईपासून जवळच असलेल्या बदलापूर येथे बालिकेवरील अत्याचारानंतर हिंसक भडका उडाला आहे. ही घटना ताजी असतानाच यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका अल्पवयीन तरुणीचा मृतदेह आढळला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही तरुणी बेपत्ता होती. दोन दिवसांपासून या तरुणीचे कुटुंबीय आणि पोलिस तिचा शोध घेत होते. अशातच मंगळवारी (ता. 20) या तरुणीचा मृतदेह नाल्यात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून तिचा शोध लागत नव्हता. त्यामुळे तिच्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांना माहिती मिळताच तिचा शोध सुरू करण्यात आला. मात्र मंगळवारी या बेपत्ता तरुणाची मृतदेह नाल्यात आढळला आहे. पोलिसांनी यासंदर्भात मुलीच्या नातेवाईकांना कळविल्या नंतर त्यांनी ‘ज्याची भीती होती तेच घडले..’ असे म्हणत हंबरडा फोडला. गावालगतच्या नाल्यातच मुलीचा मृतदेह पडून होता.

तपासाला सुरुवात 

बेपत्ता असलेली ही मुलगी गावाजवळ असलेल्या नाल्यात पडलेली होती. मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. त्यानंतर ग्रामस्थांनी नाल्याच्या परिसरात गर्दी केली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. तूर्तास याप्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मुलीच्या मृत्युमागे घातपात आहे काय, याचा तपास करण्यात येत असल्याचे पांढरकवडा पोलिसांनी स्पष्ट केले. उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर पुढे तपास करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्‍यांनी घेतली बदलापूर घटनेची गंभीर दखल !

राज्यात सुमारे 15 हजारावर महिला व मुली बेपत्ता आहे. एकट्या नवी मुंबईत (Navi Mumbai) सात महिल्यात 195 मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी 172 मुलींना पोलिसांनी शोधले आहे. उपराजधानी नागपुरातून (Nagpur) तीन वर्षांत 1 हजार 195 मुली बेपत्ता झाल्या आहेत. 2019 ते 2021 या काळात एक लाख 882 महिला व मुली बेपत्ता झाल्याची राज्यभरात नोंद आहे. मुंबईत पाच महिन्यात 507 मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यामुळे राज्यात सध्या महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोलापूर (Solapur) शहरातूनही एक हजारावर मुली बेपत्ता आहेत. महिला व मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. सरकार आणि पोलिस विभागाकडून दामिनी पथक, महिला सुरक्षा पथक, भरोसा सेल सारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानंतरही महिलांवरील अत्याचार कमी होत नसल्याचे चित्र आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!