देश / विदेश

Lok Sabha Election : सातासमुद्रापार विजयाचा डंका..

Supriya Sule : पवारांच्या 'पॉवर' ची अमेरिकेतही चर्चा

Mahavikas Agadi : लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचा बोलबाला तर महायुती माघार संपूर्ण देशभराने पहिली. राज्यातील काही महत्त्वाच्या जागांवर देशाचे नव्हे तर अख्ख्या जगाचे लक्ष लागले होते. त्यापैकी एक म्हणजे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, पर्यायाने काका शरद पवार विरुद्ध पुतण्या अजित पवार यांच्या लढतीकडे. या लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारल्या नंतर त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशात अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर झळकलेले सुप्रिया सुळे यांच्या शुभेच्छांचे बॅनर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सातासमुद्रापार विजयाचा डंका..

प्रतिष्ठेची ठरलेल्या बारामती लोकसभा क्षेत्रातील निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी 1 लाख 58 हजार 333 मतांच्या फरकाने सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. सुळे यांच्या विजयानंतर न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर त्यांचे अभिनंदन करणारा मोठा बॅनर लावण्यात आला. बॅनरचा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने ट्विटरवर पोस्ट केला आहे. तो पक्षाच्या इन्स्टाग्राम हँडलवर रिपोस्ट करण्यात आला आहे. त्याला मराठी कॅप्शन दिले आहे. “साता समुद्रापार न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये झळकल्या सुप्रियाताई सुळे यांच्या अभिनंदनाचे बॅनर.” न्यूयॉर्क येथे स्थित परीक्षित तळोकर यांनी या शुभेच्छा दिल्याचेही या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.

Congress : वडेट्टीवार म्हणतात, कृषी आयुक्तालयाचा मोठा घोटाळा

शरद पवारांसोबतचा सुप्रिया सुळे यांचा फोटो असलेल्या बॅनरचा व्हिडिओचीच चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सुप्रिया सुळेंनी ही त्यांच्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

error: Content is protected !!