महाराष्ट्र

Nitin Gadkari : गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती का? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

Supriya Sule : ..तर रोहित पवारांना गृहमंत्र्यांनी सोडलं असतं का?

Maharashtra Politics : आपल्या बिनधास्त बोलण्याच्या सवयीसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रिय मंत्री नितीन गडकरी सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. ‘तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठींबा देऊ’, असे विरोधी पक्षातील एक नेत्याने म्हटल्याचा गौप्यस्फोट गडकरींनी केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. 

गडकरी सर्वांचे लाडके नेते

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. एक वृत्तवाहीनीशी बोलताना त्या म्हणाल्या, नितीन गडकरी यांना कुणी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती की नाही, हे माहिती नाही. पण नितीन गडकरी सर्वांचे लाडके नेते आहेत. आमचे आणि त्यांचे वैचारिक मतभेद आहेत. पण असे असले तरी त्यांनी त्यांच्या वैचारिक भूमिकेत कधीही बदल केला नाही. सत्तेसाठी तडजोड केली नाही. राजकीय विरोधक असले तरी आमचे कौटुंबिक संबंध चांगले आहेत.

आम आदमी पक्षाचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासोबत दिल्लीचीही निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता जनता म्हणेल तरच मुखमंत्र्याच्या खुर्चीत बसेन, अन्यथा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. यावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या. अरविंद केजरीवाल यांच्यावर मोठा अन्याय झाला. अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यावरही गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकले होते. दोन्ही प्रकरणात शेवटी काही सिद्ध झाले नाही.

ट्रिपल इंजीन खोके सरकार जाणूनबुजून काहींचे राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करत आहे. पण येवढा खटाटोप करूनही ते काहीच साध्य करू शकणार नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी शून्यातून आम आदमी पक्षाचं झाड मोठं केलं आहे. हे क्रूर सरकार आहे, असंवेदनशील आहे आणि भाजपची वॉशींग मशीन आहेच. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. ते सत्तेत सहभागीच झाले नाहीत, तर महत्वाच्या पदांवरदेखील आहेत. एका पदासाठी तडजोड करणारे हे नेते आहेत, असेही खासदार सुळे म्हणाल्या.

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले की, फेक नरेटीव तयार केले जात आहेत, ते हाणून पाडा. आता भाजपकडे स्वतःच अजेंडा राहिला नाही. गेल्या १० वर्षांपासून त्यांचे सरकार आहे. पण त्यांनी विकास केला नाही. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही. वॉशींग मशीन चालवून भ्रष्टाचारी नेते स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे.

Nagpur : गडकरी म्हणाले, ‘पंतप्रधानपद हे माझे ध्येय नाही’

ट्रीपल इंजिन सरकारमुळे महागाई

सत्ता हे जनतेसाठी काम करण्याचे माध्यम आहे. लोकांच्या आयुष्यात चांगला बदल केला जाऊ शकतो. पण तसे होत नाहीये. या ट्रीपल इंजिन सरकारमुळे महागाई वाढली. राज्याच्या पदरात काहीच पडलं नाही. ते आम्हाला टार्गेट करण्याचा नेहमी प्रयत्न करतात. कुणीही आंब्याच्या झाडाला दगड मारतो, बाभळीच्या नाही. सशक्त लोकशाहीमध्ये आम्ही बोलतो. ते ऐकायची ताकद पाहीजे, असे म्हणत सुळे यांनी छगन भुजबळ यांनाही लक्ष्य केले. भुजबळ सरकारमध्ये आहेत. त्यांना कळायला पाहिजे की, रोहीत पवार यांनी काही केलं असतं. तर गृहमंत्र्यांनी त्यांना सोडलं असत का, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!