महाराष्ट्र

NEET Scam : पुरेसे पुरावे नसल्याने पुन्हा परीक्षा नाही

Supreme Court Of India : फेरपरीक्षेचे आदेश देण्यास नकार

Decision OF CJI : सर्वोच्च न्यायालयाने नीटची परीक्षा पुन्हा घेण्यास नकार दिला आहे. तपासादरम्यान दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या फसवणुकीत कोणताही विद्यार्थी सापडल्यास त्यांना प्रवेश मिळणार नाही. न्यायालयाने आपला अंतिम निर्णय राखून ठेवला आहे. त्यासाठी कोणतीही तारीख देण्यात आलेली नाही. नीट परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू आहे. मंगळवारी (ता. 23) सरन्यायाधीश (Chief Justice Of India) धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने फेरपरीक्षेची मागणी फेटाळली.

पेपर लीक झाल्याबद्दल कोणतेही ठोस पुरावे नाीरत. त्यामुळे पुनर्परीक्षेचा निर्णय देऊ शकत नाही, असे कोर्टाने नमूद केले. सीबीआयच्या तपासानंतर संपूर्ण चित्र बदलण्याची शक्यता आहे. परंतु सद्य:स्थितीत पेपर फुटीचे प्रकरण केवळ पाटणा आणि हजारीबागपुरते मर्यादित नाही, असे म्हणता येणार नाही. एनटीएने 1 हजार 563 विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या गुणांसह पुन्हा परीक्षा घेतली आहे. यासंदर्भात अद्यापही कोणाची तक्रार असेल तर उच्च न्यायालयात दाद मागता येईल, असे न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले.

प्रतिज्ञापत्र मागविले

नीट घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने एनटीए आणि सीबीआयकडून प्रतिज्ञापत्र मागविले होते. सीबीआयचे अतिरिक्त संचालक कृष्णा यांची बाजुही कोर्टाने ऐकून घेतली. पेपरफुटीचे प्रकरण हे पूर्वनियोजित असल्याचा एकही पुरावा मिळाला नाही. नॅशसनल टेस्टिंग एजन्सी आणि आयआयटी मद्रासने दिलेला अहवाल तपासल्यानंतर काही मुद्दे लक्षात आले आहेत. पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती फार मोठी नाही किंवा हे प्रकरण फार व्यापक नाही. पेपरफूट सुनियोजित असल्याचे दिसत नाही, असे चंद्रचूड म्हणाले.

हजारीबाग आणि पाटणा येथे पेपरफूट झाली आहे. सीबीआयच्या अहवालानुसार या दोन परीक्षा केंद्रावरील 155 विद्यार्थ्यांच्या पलीकडे आणखी काही लाभार्थी असण्याची शक्यता कमीच आहे, असे कोर्टाने नमूद केले. त्यामुळे सरसकट पुनर्परीक्षा घेता येऊ शकत नाही, असे खंडपीठाने सांगितले. देशात 5 मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप यावेळी झाला होता. काही विद्यार्थ्यांना गुणवाढ देण्यात आल्याचाही आरोप होता. त्यानंतर 40 पेक्षाा जास्त याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत ‘नीट-यूजी’चे शहर आणि केंद्रनिहाय निकाल संकेतस्थळांवर जाहीर केले. त्यातील तपशिलांनुसार, भरघोस गुण मिळाल्यानंतर फेरपरीक्षा द्यावी लागलेल्या विद्यार्थ्यांची कामगिरी तितकीशी चांगली नसल्याचे आढळले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड केलेल्या सूचीनुसार, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!