NEET परीक्षेतील गैरप्रकारांवर 11 जून रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. NEET परीक्षेतील गैरप्रकारांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. निकाल जाहीर झाल्यापासून अनेक दिवस झालेत देशाच्या कानाकोपऱ्यात विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
NEET-UG 2024 च्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या निकालात झालेल्या, हेराफेरीमुळे विद्यार्थी प्रचंड संतापले आहेत. आता NEET प्रवेश परीक्षेतील अनियमिततेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून, झालेल्या गैरप्रकाराविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हे मान्य केले की NEET-UG परीक्षेच्या निकालावर नक्कीच परिणाम झाला आहे. आता NTA ने देखील याबाबत उत्तर द्यावे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एनटीए आणि सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी 8 जुलै रोजी ठेवली आहे.
फेरपरीक्षेची मागणी
शिवांगी मिश्रा आणि इतर 9 जणांनी NEET UG परीक्षा रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. ही याचिका 1 जून रोजी दाखल करण्यात आली होती. सर्व 10 याचिकाकर्त्यांनी NEET UG परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची मागणी केली आहे. निकाल जाहीर होण्याची तारीख आधी 14 जून होती. काही उमेदवारांना ग्रेड्स गुण देण्याच्या एनटीएच्या निर्णयावरही याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
राजकीय पक्षाची मागणी
डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विद्यार्थ्यांना NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा फकटा बसला आहे. त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. या परिक्षेत गैरप्रकार झाल्याने लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरही अन्याय झाला असून सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. नीट परिक्षेतील घोटाळा पाहता या प्रकरणाची सर्वंकश चौकशी करावी. अशा गैरप्रकारंवर सरकार शांतता का राहते? निकालाचे फेरमुल्यांकन करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.