महाराष्ट्र

Supreme Court : किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा 

Tirupati Balaji : 3 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी 

Andhra Pradesh : मागील काही दिवसांपासून श्री वेंकटेश्वर स्वामी (तिरुपती बालाजी) देवस्थान येथील प्रसादम म्हणजेच लाडू चर्चेचा विषय ठरला आहे. तिरुपती बालाजी येथे भाविकांना प्रसाद म्हणून लाडूचे वितरण करण्यात येते. मात्र, लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये जनावरांची चरबी असल्याचे आरोप झाले होते. या खळबळजनक आरोपानंतर बरीच चर्चा होऊ लागली. हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आहे. न्यायालयात यासंदर्भात सुनावणी चालू आहे. या सुनावणीदरम्यान कोर्टाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

आरोप-प्रत्यारोप सुरू

तिरुपती देवस्थान येथील सुरू असलेल्या वादाला राजकीय वळण आले आहे. अनेक नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. आंध्र प्रदेश येथील मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीच सर्वप्रथम मागील सरकारच्या कार्यकाळात तिरुपती देवस्थान येथे लाडू बनविण्यासाठी प्भेसळयुक्त तूप वापरले जाते, असा खळबळजनक आरोप केला होता. परंतु आंध्र प्रदेशमधील पूर्वीच्या सरकारकडून म्हणजेच वायएसआरसीपीकडून हे आरोप फेटाळण्यात आले होते. यावरून आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले आहेत.

काय म्हणाले न्यायाधीश

“किमान देवांना तरी राजकारणापासून दूर ठेवा, अशी अपेक्षा आम्ही करतो”, अशी न्यायालयाने टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती बी. के. गवई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यावेळी “हा श्रद्धेचा व आस्थेचा विषय आहे. जर भेसळयुक्त तूप वापरले जात असेल, तर ते अजिबात स्वीकार केले जाणार नाही”, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयापुढे केला. यानंतर तुषार मेहता यांच्या या युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी यासंदर्भातील पुराव्याची मागणी केली. “प्रसादम म्हणून लाडू बनविण्यासाठी भेसळयुक्त तूप वापरण्यात आले होते, याचा काय पुरावा आहे?” असा प्रश्न न्यायालयाने तुषार मेहता यांच्यासमोर उपस्थित केला. 

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!