प्रशासन

Assembly Election : ईव्हीएमच्या सुरक्षेत हलगर्जी; तिघे निलंबित

Surprise Checking : जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीत आढळला प्रकार 

Karanja Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. कारंजा येथील शेतकरी निवास परिसरात विधानसभा निवडणुकीसाठी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे. यामध्ये निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम ठेवण्यात आले आहे. ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या स्ट्रॉंग रूमची तपासणी वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वर एस. यांनी अचानक केली. 

जिल्हाधिकारी कारंजा पोहोचल्या त्यावेळी स्ट्रॉंग रूम मध्ये तैनात केलेले कर्मचारी गाढ झोपेत होते. अधिकाऱ्यांनी स्वतःच या पोलिसांना झोपेतून जागे केले. त्यानंतर याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी वाशिमचे पोलिस अधीक्षक अनुज तारे यांना दिली. या संपूर्ण प्रकाराची चौकशी केल्यानंतर तारे यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांना निलंबित केले आहे. गजानन मनवर, सुरेश सोनोने, गणेश थोरात, जितेंद्र साखरकर अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

मुख्यालयात नेमणूक 

निलंबित करण्यात आलेल्या सर्व पोलिसांची नेमणूक करतात पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे. निवडणुकीतील कर्तव्यात कसूर हा गंभीर अपराध असून यातून कोणाचाही मलाही जातीला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी तथा पोलिस अधीक्षक दोघांनीही स्पष्ट केले. राज्यभरामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आल्या आहेत. या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ईव्हीएममध्ये घोळ होत असल्याचा आरोप सतत केला जातो. त्यामुळे स्ट्रॉंग रूमच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात येते. दर काही तासानंतर वेगवेगळे अधिकारी या स्ट्रॉंग रूमची तपासणी करत असतात.

ईव्हीएम सुरक्षित आहेत की नाही, याची खात्री करणे हा त्यामागील उद्देश असतो. या भागात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या नावाची नोंदणी करण्यात येत असते. स्ट्रॉंग रूमच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आलेले असतात. अशात कॅमेराची नजर चुकवून कारंजा येथील स्ट्रॉंग रूम परिसरात पोलिसांनी घेतलेली झोप खळबळ उडवणारी ठरली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांनीही प्राथमिक पुराव्यांच्या आधारे तत्काळ कारवाई केली आहे.

Assembly Election : ईव्हीएमवर नजर ठेवणार ‘जीपीएस’!

रंगेहात पकडले 

झोप घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याने हे प्रकरण संबंधित पोलिसांसाठी अंगलट येणारे ठरले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती वाशिमचे पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी दिली आहे. दोषी आढळणाऱ्या पोलिसांवर नियमानुसार कठोर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्यात झालेल्या या कारवाईमुळे पश्चिम विदर्भातील पोलिस विभागात सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!