Bhandara-Gondia Constituency : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव झाला. त्यानंतर राजकीय जाणकार अनेक समीकरणे तपासू लागले आहेत. दरम्यान अपक्षांनीही केवळ 28 हजारच मते खेचल्याने पडोळे यांचा विजय झाल्याचेही एक अनुमान आहे. विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना 35 हजार 456 मतांनी पराभूत करून डॉ. प्रशांत पडोळे यांनी बाजी मारून नेली.
रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवारांनी तब्बल 28 हजार 991 मते खेचली. त्यामुळे मेंढे यांना पराभवाचा धक्का बसला. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्याच टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यानंतर तब्बल 4 जूनपर्यंत म्हणजेच सुमारे दीड महिना उमेदवारांसह दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना निकालाची उत्सुकता लागून होती.
नरेंद्र मोदींप्रमाणे भाजपचे सुनील मेंढे बहुमताने निवडून येतील, असे तर्क लावले जात असताना आलेल्या निकालाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.काँग्रेसचे उमेदवार डॉ. पडोळे यांनी अवघ्या 35 हजार 456 मतांनी मेंढे यांना मात दिली. येथे धक्कादायक बाब म्हणजे केवळ 35 हजार 456 मतांनी मेंढे यांना हार पत्करावी लागली आहे. हा भाजप नेत्यांसाठी मोठा धक्का आहे.
Prataprao Jadhav : एनडीए मंत्रिमंडळाच्या फॉर्मुल्यात प्रतापराव फिट !
या निवडणुकीत रिंगणात असलेल्या 11 अपक्ष उमेदवारांनी 28 हजार 991 मते तर नोटाने 10 हजार 106 अशाप्रकारे एकूण 39 हजार 97 मते मिळविली. तर दुसरीकडे मेंढे यांचा पराभव 37 हजार 380 मतांनी झाला. अशात आता नवनवे समीकरण लावले जात आहेत. अपक्ष आणि नोटाने घेतलेल्या मतांएवढाच फरक मेंढेंच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याने कित्येक जण तर आता या पराभवाला अपक्ष व नोटालाच चर्चेतून कारण ठरवत आहेत.
नाही चालली वाघायेंची जादू..
दूसरीकडे या निवडणुकीत माजी आमदार सेवक वाघाये रिंगणात उतरले होते. भंडारा जिल्ह्यात त्यांची चांगली पकड असल्याचे बोलले जात होते. अशात वाघाये यांनी जास्तीत जास्त मते घेतली असती तर मेंढे यांच्यासाठी ती जमेची बाजू ठरली असती. मात्र, वाघाये यांना फक्त 12 हजार 899 मतांवरच समाधान मानावे लागले. परिणामी मेंढेंच्या पराभवात हा सुद्धा एक मुद्दा महत्वाचा ठरला आहे.