महाराष्ट्र

Bhandara Gondia : गृहक्षेत्रातही सुनील मेंढे पराभूत

Lok Sabha : भंडाऱ्यातील माधवनगरवासियांनाही शेजारी मेढेंना नाकारले

कोणत्याही उमेदवारासाठी त्याच्या गाव महत्वाचे ठरते. त्यामुळे गावातील सर्वाधिक मते पदरी पडावी यासाठी सर्व खटाटोप सुरू असतो. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात उमेदवार विजयी ठरण्यासाठी गावात पडलेली मते कारणीभूत ठरली आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी बाजी मारली. त्यांनी महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा 37 हजार 380 मतांनी पराभव केला. तर बसपाचे संजय कुंभलकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्यांच्या गावात मतांची आघाडी मिळाली, तर महायुतीच्या उमेदवाराला कमी मते मिळाली आहेत.

महाविकास आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे हे भंडारा शहरातील सहकारनगर केसलवाडा रोड रहिवासी येथील रहिवासी आहेत. या ठिकाणी त्यांना मतांची आघाडी मिळाली आहे. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे हे माधवनगर खात रोड भंडारा येथील रहिवासी असून, त्यांना कमी मते मिळाली आहे. विशेष म्हणजे, सुनील मेंढे हे दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक रिंगणात होते, तर यापूर्वी भंडारा शहराचे नगराध्यक्षसुद्धा राहिले आहेत. मात्र यानंतरही त्यांना या लोकसभा निवडणुकीत गृहनगरातच कमी मते मिळाली आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे हे नवखे उमेदवार असतानासुद्धा त्यांना गृहक्षेत्रात अधिक मते घेण्यात यश आले आहे.

Nagpur Blast : होरपळून अनेक कामगारांचा मृत्यू

भाजप उमेदवार सुनील मेंढे यांना त्यांच्या गावात माधवनगर, खात रोड, भंडारा 99 हजार 757 मते मिळाली आहे. सुनील मेंढे यांना त्यांच्या गृहक्षेत्रात कमी मताधिक्य मिळाले आहे. गृहक्षेत्रात कमी मताधिक्य मिळाल्याने त्यांच्या विजयात अडचण निर्माण झाली. कमी मताधिक्यामुळे सुनील मेंढे यांचे दुसऱ्यांदा लोकसभेत जाण्याचे स्वप्न भंगले, तर गृहक्षेत्रातच मतांचा खड्डा पडल्याने त्यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. काँग्रेस उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांना त्यांच्या गावात सहकारनगर केसलवाडा रोड, भंडारा येथे 1 लाख 22 हजार 428 मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांना गृहनगरात आघाडी मिळाली. यामुळे त्यांचा लोकसभेत जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. गृहनगरात मिळालेल्या मताधिक्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारीतसुद्धा वाढ झाली आहे. मतदारांनी त्यांच्यावर व्यक्त केलेल्या विश्वासास त्यांना आता खरे उतरावे लागणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!