लोकसभेच्या पराभवानंतर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी विधानसभेत राज्यसभेच्या सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. आता राज्यसभेवर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर बारामतीच्या काठेवाडीत कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. त्यांच्या विरोधात एकही उमेदवार दिला नसल्याने सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड झाली आहे. 18 जून मंगळवारी निवडणूक निर्णय अधीकारी यांनी सुनेत्रा पवारांची अधिकृतरित्या घोषणा केली.
बिनविरोधी निवड
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोधी निवड झाली आहे. केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची ऑफर आल्यास ती आनंदाने स्वीकारू, असे त्यांनी याआधीच स्पष्ट सांगितले. सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून देखील लोकसभा निवडणूक लढवली होती. पण सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी राज्यातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
उमेदवारांची दांडी
अर्ज भरताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते उपस्थित होते. मात्र महायुतीच्या उमेदवारांची यावेळी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं. बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभव झालेल्या सुनेत्रा पवारांनी आता संसदेत मागच्या दरवाजानं एन्ट्री घेतली आहे. राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवार अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार आधीच निश्चित झालं होतं.
18 जून मंगळवारी विधानभवनात जाऊन सुनेत्रा पवारांनी अर्ज दाखल केला. दरम्यान यावेळी अजित पवार उपस्थित होते. शिवाय सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळही उपस्थित होते. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी छगन भुजबळ, प्रफुल पटेलही इच्छुक होते, मात्र उमेदवारीची माळ सुनेत्रा पवारांच्या गळ्यात पडली आहे.
NCP Politics : महायुतीतील दादांचा गट वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत ?
अनेकांचा झाला हिरमोड !
बारामती लोकसभा मतदार संघात निवडणुकीत तीन टर्मपासून खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांना भाऊजई सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिलं होतं. पण बारामतीत पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आहे. तब्बल १ लाख ५८ हजार मतांच्या फरकाने सुप्रिया सुळे यांनी विजय मिलवला. पण पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. या पदासाठी राष्ट्रवादीतले अनेक जण इच्छूक असल्याचं देखील बोललं जात होतं. यामध्ये छगन भूजबळ आणि प्रफुल्ल पटेलांच नाव अग्रक्रमावर होते. पण सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर चर्चेला पूर्णविराम लागला.