महाराष्ट्र

BHEL Project : खटाईत पडले ‘भेल’; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Industrial Development : मुलांच्या रोजगारबाबत चिंचेतून उचलले टोकाचे पाऊल

Employment Issue : भंडारा जिल्हाच्या साकोली येथील भेल प्रकल्प 12 वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत येथील भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना वारंवार प्रशासनाला उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याची परवानगी मागत आहे. पण शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यातच मुलांच्या बेरोजगारीला कंटाळून एका आदिवासी शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शंकर कंगाले (वय 54) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. कंगाले साकोलीजवळील मुंडीपार (सडक) येथील रहिवासी आहेत. 

प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने 5 जुलैला येथे उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनाने उपोषणाची परवानगी नाकारली. अशातच शंकर कंगाले या शेतकऱ्याने घरी काहीही न सांगता विषारी कीटकनाशक प्राशन केले. ही माहिती कळताच भेल प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष विजय नवखरे व सहकाऱ्यांनी त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखलक केले. सुरुवातीला साकोली येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आलेत. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना भंडारा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. या संतापजनक प्रकाराने साकोली तालुक्यासह जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. शेतकऱ्यााची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत मौन बाळगण्यात येत आहे.

प्रकल्पग्रस्तांचा वाली कोण?

शेतकरी शंकर कंगाले यांची शेतजमीन भेल प्रकल्पात गेली होती. हा प्रकल्प 12 वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे अनेक प्रकल्पग्रस्त निराश झाले आहेत. कंगाले यांना दोन मुले आहेत. एक मुलगा बेरोजगार आहे. वडील व मुलगा मोलमजुरी करून प्रपंच चालवितात. मुलाचे वाढते वय व दिवसेंदिवस वाईट होत चाललेली आर्थिक स्थिती या विवंचनेतून प्रकल्पग्रस्त कंगाले यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यासाठी भेल प्रकल्प महत्वाकांक्षी होता.

भेल प्रकल्प जिल्ह्यात आला असता तर अनेकांच्या हाताला काम मिळाले असते. मात्र राजकीय नेत्यांनी या प्रकल्पाची भेळपुरी बनवून टाकली आहे. आता हाच मुद्दा राजकारण करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

Ladki Bahin : महायुतीत श्रेय घेण्यासाठी चढाओढ

जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी भेल प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. या प्रकल्पामुळे भंडारा जिल्ह्याला एक वेगळी ओळख मिळेल, अशी आशा अनेकांनी होती. मात्र केवळ जमीन अधिग्रहित करण्यापुरता हा प्रकल्प मर्यादीत राहिला.

भंडाऱ्यात सध्या भेल प्रकल्प केवळ कागदांवरच आहे. सुमारे एक तपाचा (बारा वर्ष) काळ लोटल्यानंतरही भेलच्या रुपाने रोजगाराची गंगा भंडारा जिल्ह्यात प्रवाही झालेली नाही. या प्रकल्पाची एक वीट सुद्धा रचली गेलेली नाही.

 

भंडारा जिल्ह्यात वजनदार राजकीय नेत्यांची कमी नाही. मुंबई आणि दिल्लीत अनेकांनी सत्ता गाजविली, असे नेते या जिल्ह्यात आहेत. परंतु ते या भागातील तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात अपयशी ठरले आहेत. विदर्भातील केवळ नागपूर शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. आजही हा विकास होत आहे. परंतु केवळ नागपूरचा ‘मेकओव्हर’ झाला म्हणून पूर्ण विदर्भाचा विकास झाला असे म्हणता येणार नाही.

आजही विदर्भातील अनेक जिल्हे उद्योग, सिंचन, वीज, रोजगार, शिक्षण, मूलभूत सुविधा यांच्या बाबतीत माघारलेलेच आहे. प्रकल्प कागदांवरच आहे. शेतकऱ्यांनी जमीन हातातून गेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर बिकट परिस्थितीला तोंड देण्याची वेळ आली आहे. परिणामी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

Maharashtra Government वसतिगृहांअभावी स्वाधार झाली निराधार

भेल प्रकल्प साकारणार नसेल तर अधिग्रहित करण्यात आलेली जमीन शेतकऱ्यांना परत करणे गरजेचे आहे. परंतु यापैकी काहीही होताना दिसत नाही. खटाईत पडलेली भेल आता कोणाचा जिवावर उठते, याची चिंता सर्वांना आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!