महाराष्ट्र

Military School Chandrapur : वनमंत्र्यांनी सांगितले, विद्यार्थिनींना प्रथमच प्रवेशातील आरक्षणाचे कारण

Sudhir Mungantiwar : विदर्भाच्या मातीत राष्ट्रभक्तीच्या बिजारोपणाचे समाधान

Inspiration Of Patriotism : चंद्रपूरसह विदर्भातील मुलांमध्ये राष्ट्रसेवा, राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लागावी याच हेतुने देशातील सर्वांत अव्वल सैनिक शाळा स्थापन करण्यात आली आहे. या सैनिक शाळेत शिक्षण घेत देशातील सर्वोत्तम सैनिक अधिकारी तयार व्हावे. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रसेवा घडावी, असे विचार वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी देशात पहिल्यांदा सैनिक शाळेत विद्यार्थिनींना प्रवेशात आरक्षण कसे मिळाले, याचा किस्सा सांगितला. 

चंद्रपूर येथील सैनिक शाळेत आयोजित एका कार्यक्रमात मंत्री मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, चंद्रपुरात सैनिक शाळा स्थापन होण्यापूर्वी राज्यात बोटावर मोजण्या इतक्या ठिकाणी अशा शाळा होत्या. आज परिस्थिती अशी आहे, की चंद्रपुरातील सैनिक शाळेचा नावलौकिक देशात आहे. देशभरातील सैनिक शाळांतील विद्यार्थी आता येथे येत आहेत. चंद्रपुरात सैनिक शाळा स्थापन करणे, हे आपले स्वप्न होते. हे स्वप्न साकार झाल्याचे पाहून मातृभूमीची सेवा केल्याचे समाधान मिळते, असे मुनगंटीवार म्हणाले.

विद्यार्थिनीही कमी नाहीत..

महिलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रसंगी पुरुषांपेक्षाही मोलाची कामगिरी बजावली आहे. राजमाता जिजाऊंपासून राणी लक्ष्मीबाईपर्यंतचा इतिहास आपल्याला हे दाखवून देतो. त्यामुळे सैनिक शाळेतही विद्यार्थिनींसाठी जागा असाव्या आपला आग्रह होता. परंतु अधिकाऱ्यांनी आपल्याला अशी कोणतीही तरतूद नसल्याचे सांगितले. नारीशक्ती कोणापेक्षा कमी नाही, हे ठाऊक होते. त्यामुळे आपण ही बाब योग्य नसल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. आपण नारीशक्तीला आदीशक्ती स्वरुपात पुजतो, मानतो. त्यामुळे त्यांना स्थान मिळालेच पाहिजे, असा आग्रह केल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

विद्यार्थिनींच्या विषयावर जेव्हा अधिकाऱ्यांसोबत ही चर्चा सुरू होती, त्यावेळी देशाच्या रक्षामंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) होत्या. आपण अधिकाऱ्यांना सांगितले की, जसे रक्षामंत्री म्हणून सीतारामण कमी पडणार नाही, अगदी त्याच पद्धतीने देशाच्या रक्षणात मुली कधीही कमी पडणार नाहीत. अधिकाऱ्यांना हा मुद्दा पटला. त्यानंतर देशात प्रथमच सैनिक शाळेत विद्यार्थिनींना दहा टक्के आरक्षण मिळाले. पहिल्यांदा हे आरक्षण मिळाले ते चंद्रपूरच्या सैनिक शाळेत. त्यानंतर देशातील इतर शाळांमध्ये ही पद्धत सुरू झाल्याचे मुनगंटीवार यांनी नमूद केले. चंद्रपूरनंतर देशाच्या अन्य सैनिक शाळांसाठी शासन निर्णय (GR) काढण्यात आला.

Sudhir Mungantiwar : 75 नवीन चित्रनाट्यगृहं; निःशुल्क चित्रीकरण!

सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मुनगंटीवार यांनी राष्ट्रभक्तीचे स्फूरण भरले. तुमची सही जोपर्यंत ‘ऑटोग्राफ’ बनणार नाही, तोपर्यंत शांत बसू नका. मातृ-पितृ आणि राष्ट्रभक्ती शिवाय कोणतीही भक्ती श्रेष्ठ नाही. राष्ट्रभक्ती करताना कार्य असे करा की तुमच्या आईवडिलांची मान अभिमानाने ताठ झाली पाहिजे. विद्यार्थी दशेपासूनच स्वत:ला असे घडवा की अख्ख्या देशाने तुमच्या कार्याला कडक सॅल्यूट केला पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!