महाराष्ट्र

Shivaji Maharaj : वाघनखाबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणाले..

Sudhir Mungantiwar : विलंब होत असल्याबद्दल दिली माहिती

Maharashtra News : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. अशी शक्यता राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. यामुळे काही प्रक्रिया करताना थोडी अडचण येत आहे. आचारसंहिता संपताच पुढील प्रक्रिया होईल, असे त्यांनी सांगितले. मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीमुळे वाघनखं आणण्यास विलंब का होत आहे, याचे खरे कारण जनतेपुढे आले आहे.

वाघनखं महाराष्ट्रात येण्यासाठी आम्ही 04 मे ही तारीख निश्चित करण्यात आली होती. त्याबाबत संपूर्ण पत्रव्यवहार झाला आहे. वाघनखं येण्याबाबत मंजुरी लिखित देण्यात आली आहे. परंतु अशात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली. आचारसंहिता लागू असताना वाघनखं महाराष्ट्रात आणण्यात काही अडचणी येत होत्या. आक्षेप आला असता. विरोधी पक्षांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असती. निवडणूक बघून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मतदारांना भावनिक आवाहन केले जात आहे, असा आरोप केला गेला असता, असे मुनगंटीवार म्हणाले.

शिवबा हृदयात हवे

शिवबा हृदयात पाहिजे, असे सांगत मुनगंटीवार म्हणाले की, शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. त्यामुळे आचारसंहिता संपताच वाघनखं महाराष्ट्रात येतील. यासाठी 10 जून तारीख आम्ही निश्चित केली आहे. 10 जूनला वाघनखं आणायचे असतील तर निवडणूक आयोगाकडून पत्र लागणार आहे. आचारसंहिता 10 जून आधी संपेल, असे त्यात हवे आहे. त्यामुळे निवडणूक आयुक्तांसोबत चर्चा केली. निवडणूक आयोगाने आम्हाला वाघनखाबाबत 10 जूनबाबत प्रस्ताव पाठवण्यास सांगितले, असे मुनगंटीवार म्हणाले.

प्रस्ताव येणार

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वाघनखाबाबत प्रस्ताव येणार आहे. त्यानंतर आयोगाकडून मंजुरी अपेक्षित आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी मंजुरी लेखी स्वरुपात दिली. त्यांचे पत्र आम्हाला ब्रिटनच्या म्युझियमसाठी पाहिजे आहे. ज्यामध्ये त्यांनी 04 जूनला आमची आचारसंहिता संपेल असे लिहून दिलेले असेल. त्यानुसार आम्हाला 10 जून तारीख आताच निश्चित करता येईल. वाघनखं ठेवण्यासाठी लागणारी सुरक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. निधी मंजूर करून टेंडरही पूर्ण झाले आहे. सुरक्षेसाठी कोणतेही अडचण नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Lok Sabha Election : गावकरी मतदानावर बहिष्कार टाकणार

म्हणून झाला विलंब 

आचारसंहितेमध्ये वाघनखांबद्दल कारण नसताना उगाच अडचण येऊ नये असे आम्हाला वाटते. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झालेलीच आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत वाघनखं येतील, अशी शक्यता सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. वाघनखांसाठी काही जागा निश्चित केल्या आहेत. साताऱ्यापासून त्याची आम्ही सुरूवात करणार आहोत. साताऱ्यानंतर नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या म्युझियममध्ये वाघनखं ठेवल्या जातील, असे संस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!