महाराष्ट्र

Cultural Policy : नवे सांस्कृतिक धोरण राज्याला काय देणार? मुनगंटीवार म्हणाले….

Sudhir Mungantiwar: आजवरच्या सांस्कृतिक धोरणात नवे धोरण सर्वोत्कृष्ट ठरेल

प्रत्येक राज्याची आपली एक संस्कृती असते. ती जोपासण्याचे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडायचे असते. त्यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभागही तेवढाच सक्षम असावा लागतो. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्यातील दूरदृष्टीने या विभागाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. सांस्कृतिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी त्यांनी या कार्यकाळात नवनवीन कल्पना राबवल्या. त्याची चर्चा राज्यातच नव्हे तर देशभर नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यांतही झाली.

नुकतेच नवे सांस्कृतिक धोरण आखले गेले आहे. हे नवे सांस्कृतिक धोरण राज्याला काय देणार, हे मुनगंटीवार यांनी त्यांच्या शब्दांत सांगितले. ते म्हणाले, सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीने नव्याने तयार केलेला अहवाल सर्वंकष आणि सर्वसमावेशक आहे. त्याआधारे तयार होणारे नवीन सांस्कृतिक धोरण राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला अग्रेसर बनविणारे ठरेल. सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन समितीचा अंतिम अहवाल त्यांना सादर केला. त्यानंतर मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीचे ज्येष्ठ सदस्य गिरीश प्रभुणे, सुहास बहुळकर, दीपक करंजीकर, सोनूदादा म्हसे, जगन्नाथ हिलीम यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आज (ता. 25) चर्चा केली. आजवरच्या सांस्कृतिक धोरणात नवे धोरण सर्वोत्कृष्ट ठरेल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या कार्याध्यक्षतेखालील या समितीने वर्षभर अतिशय मेहनत या अहवालाकरता घेतली आहे.

राज्यातील विविध भागांत दौरे करून विविध क्षेत्रांतील तज्ञ आणि दिग्गजांशी चर्चा केली आहे. अनेक संस्था आणि संघटनांशी संवाद साधला आहे. विषयवार दहा उपसमित्या त्यांनी गठित केल्या होत्या. त्यांच्या अनेक बैठका वर्षभरात घेतल्या आहेत. आजवर एवढा विस्तृत अभ्यास क्वचितच केला गेला असेल, असे सांगून सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, या विस्तृत अहवालातील शिफरशींवर आधारित तयार होणारे नवे सांस्कृतिक धोरण त्यामुळेच सर्वंकष आणि सर्वसमावेशक असेल. हे धोरण राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला देशात अग्रेसर व अव्वल बनविणारे ठरेल.

NCP News : विधानसभा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करा

लोकसहभाग वाढवणार..

या कार्यात लोकसहभाग अजून वाढविण्याकरीता आणि जनजागृती करण्याकरिता सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या सदस्यांनी राज्य़ातील विविध भागांत दौरे करून जनतेशी संवाद साधावा. या अहवालात सुचविण्यात आलेल्या तरतुदीं आणि धोरणविषयक शिफारशींबाबत जनजागृती करावी. जनतेकडूनही विविध सूचना मागवाव्यात असेही मुनगंटीवार यांनी समिती सदस्यांना सूचवले.

याप्रसंगी बोलतांना समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी समितीची सर्वसाधारण कार्यपद्धती, घेतलेल्या बैठका, विविध उपसमित्यांचे कार्य आणि अहवालात सूचविलेल्या बाबी यांची माहिती दिली. या अहवालात प्रस्तावना, समितीची कार्यपद्धती, विविध भेटींवर आधारित नीरिक्षणे, धोरणापलिकडील दृष्टी, धोरणात्मक शिफारशी आणि कार्यात्मक शिफारशी आणि उपसमित्यांच्या मूळ शिफारशी अशी विविध प्रकरणे असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!