महाराष्ट्र

Lok Sabha Election : गोंडपिपरीला दिलेला शब्द पाळला; काँग्रेसने काय दिले?

Chandrapur Constituency : सुधीर मुनगंटीवार यांचा खडा सवाल

BJP News : गोंडपिपरीच्या सभेत विकासनिधी आणण्याचा शब्द मी दिला होता. 23 कोटी 50 लाख रुपयांचा निधी आणून मी शब्द पूर्ण केला, पण काँग्रेसच्या लोकप्रतिनिधीने काय केले?, असा खडा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला. मला लोकसभेत निवडून दिले तर गोंडपिपरीचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

गोंडपिपरी येथे आयोजित सभेला मुनगंटीवार संबोधित करत होते. यावेळी माजी आमदार अॅड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, बबन निकोडे, अमर बोडलावार, चेतनसिंग गौर, मनिषा मडावी, मनिषा दुर्योधन, शारदा गरपल्लीवार, अश्विनी तोडासे, कोमल फरकाडे, सुरेखा श्रीकोंडावार व अॅड. अरुणा जांभुळकर आदींची उपस्थिती होती.

गोंडपिपरी परिसराचा विकास करण्याची माझी तीव्र इच्छा आहे. हे कार्य मतदारांच्या आशीर्वादाशिवाय अशक्य आहे. मला निवडून दिले तर गोंडपिपरीतील अपूर्ण कामे पूर्ण करेन. तुम्ही मला जेवढे मतदान कराल त्याच्या कित्येक पट भरभरून विकास आपल्या वाट्याला येईल. जो देशाच्या बाजूने उभा राहिला त्याच्या बाजूने हा देश उभा राहिल, अशी सादही मुनगंटीवार यांनी घातली.

PM Modi in Chandrapur : हे दारूच्या धंद्यातून कमावलेल्या पैशांतून भरलेले डिपॉझीट नाही, मुनगंटीवार कडाडले !

एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र, सैनिक शाळा, बॉटनिकल गार्डन, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, स्टेडियम, सामाजिक सभागृह, नाट्यगृह, चिचडोह प्रकल्प अशा अनेक विकास कामांचा उल्लेख करताना मुनगंटीवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात येणे निश्चित आहे. मोदींचा विकासरथ गोंडपिपरीपर्यंत आणण्याचे वचन देतो. मोदींना साजेसा खासदार तुम्ही निवडून दिला, तर महिला, बेरोजगार, बचत गटांचा लोकसभेत आवाज बुलंद करेन. संसदेला चंद्रपूरचे दरवाजे लावलेले असल्यामुळे ‘खुल जा सिमसिम’ असे म्हणताच आपल्यासाठी अर्ध्या रात्रीही हे दरवाजे खुले होतील. राज्य आणि केंद्राच्या तिजोरीतील निधी देखील गोंडपिपरीच्या विकासासाठी आणता येईल, अशी ग्वाहीही मुनगंटीवार यांनी दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!