महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : महाविकास आघाडीलाच मराठा आरक्षण नको

Maratha Reservation : फोडाफोडीचे जनक शरद पवारच

Maharashtra Politics : मराठा आरक्षणाचा खरा शत्रू हा शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनाच खरे तर मराठा आरक्षण नको. त्यामुळेच भाजपने दिलेलं आरक्षण त्यांना न्यायालयात टिकवता आलं नाही, अशी टीका राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 

एका मुलाखतीत त्यांनी आरक्षणाच्या विषयावर ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘भाजपला जात, धर्म, पंथ यांचे राजकारण मान्य नाही. भाजप राष्ट्रभक्ती करणारा पक्ष आहे. भाजपसाठी राष्ट्र सर्वतोपरी आहे. भाजपने (BJP) कधी कोणता पक्ष फोडला नाही. परंतु महाविकास आघाडीने हे प्रयत्न भाजपसाठी सुरू केले होते. त्याचेच प्रत्युत्तर त्यांना मिळाले.’ फोडाफोडीचे राजकारण सर्वांत पहिले शरद पवार यांनी सुरू केले, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.

राज्य प्रगतीकडे

आर्थिक पाहणी अहवाल, नीती आयोगाचा अहवाल, संयुक्त राष्ट्र संघाचा अहवाल आदी पाहिल्यास महाराष्ट्रानं महायुती (Mahayuti) सरकारच्या काळात किती प्रगती केली, हे स्पष्टपणे दिसेल, असं मुनगंटीवार म्हणाले. संविधान बदलले जाणार, आरक्षण जाणार, मुस्लिमांवर अत्याचार होणार, दलितांना त्रास दिला जाणार असा अपप्रचार महाविकास आघाडी सतत करीत आहे. एक, दोन वेळा ‘लांडगा आला रे आला’ अशी ओरड करणाऱ्यावर लोक विश्वास ठेवतात. मात्र नंतर त्यालाच गावकरी पिटतात ही कथा सगळ्यांनीच ऐकली असेल. अशीच अवस्था महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) होणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.

उद्योजकांना लुटले 

महाराष्ट्रातून उद्योग पळाले, असा आणखी एक अपप्रचार काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं सुरू केला आहे. असं काहीही झालेलं नाही. उलट महाविकास आघाडी सरकारच्या काळातच उद्योग बंद पडले. त्यांनीच उद्योजकांना लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं उद्योजकांनी महाराष्ट्राकडं पाठ फिरविल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री होतो. स्वातंत्र्यानंतर देशातील पहिलं सरप्लस बजेट आपण दिलं. यावरून हे शक्य होऊ शकते हे सिद्ध झालं. त्यावरून काँग्रेसनं महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आतापर्यंत लुटण्याचंच काम केल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!