Assembly Election : लोकांच्या सुखदु:खात धावून जाणारा लोकनेता म्हणून चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांचं नाव घेतलं जातं. ‘सुधीरभाऊंने जो बोल दिया, तो समझलो हो गया’, अशी विकास कामांच्या बाबतीत त्यांची ओळख आहे. शेकडो आरोग्य तपासणी शिबिरांच्या माध्यमातून मुनगंटीवार यांनी बल्लापूरच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील असंख्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली. पालकमंत्री या शब्दातील पालकत्वाचा अर्थ जाणून घेत त्यांनी अनेकांना दुर्धर आजाराच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी प्रसंगी देशभरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार मिळवून दिलेत. त्यामुळं मुनगंटीवार यांचा प्रचार सुरू असताना अनेक भावनिक प्रसंग बघायला मिळत आहेत.
लाडकी बहिण योजना सुरू झाल्यानंतर चंद्रपुरातील अनेक महिलांचं आधार कार्ड अपडेट्स नव्हतं. शासनस्तरावर निर्देश देत मुनगंटीवार यांनी ते करून घेतलं. पीकविम्याचा मोबदला न मिळाल्यानं शेतकरी कुटुंबातील अनेक माताभगिनी चिंतेत होत्या. मुनगंटीवार यांनी कृषिमंत्र्यांना बैठक घ्यायला लावली. त्यामुळं केवळ चंद्रपूरच नव्हे तर राज्यभरातील शेतकऱ्यांचा पीकविम्याचा प्रश्न मार्गी लागला. परिणामी चंद्रपुरातील शेतकरी कुटुंबातील महिलांचे हात मुनगंटीवार यांना आशीर्वाद देण्यासाठी सरसावले.
भावनिक क्षण
मुनगंटीवार प्रचार करीत आहेत. गावागावांमध्ये जाणाऱ्या मुनगंटीवार यांना अनेक महिला औक्षण करीत आहेत. अलीकडेच भाऊबिजेचा सण झाला. यातील अनेक महिलांची परिस्थिती बिकट असतानाही त्या नारळ, दुपट्टा, शाल आदी मुनगंटीवार यांना औक्षण करताना देत आहे. त्यामुळं अनेकांचे मुनगंटीवार यांच्याशी भावनिक ऋणानुबंध जुळल्याचं दिसत आहे. असेच भावनिक साद घालणारे फलकही आता अनेक गावांमध्ये महिलांनी लावले आहेत. हे फलक चंद्रपूर, बल्लापूरमध्ये लक्षवेधी ठरत आहेत. निवडणूक आली म्हणून वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आता लोकांच्या घरी जात आहेत. पण त्यांना मतदारांनी या फलकांच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.
‘नको कोणती ताई, नको कोणते दादा, नको कोणते नवखे भाऊ, आम्हाला हवे फक्त सुधीरभाऊ, फक्त सुधीरभाऊ’ असे फलक बल्लारपूर मतदारसंघात अनेक ठिकाणी दिसत आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी मुनगंटीवार यांनी अनेक योजना राबविल्या. बचत गटांसाठी बाजारपेठची नुकतीच मुहूर्तमेढ रोवली. सावित्रीच्या लेकी उच्चशिक्षित व्हाव्या म्हणून एसएनडीटी विद्यापीठाचं केंद्र चंद्रपुरात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. सैनिक शाळेत विद्यार्थिनींसाठी आरक्षण आलं. बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तुंच्या निर्मितीत महिलांचा सहभाग वाढला. त्यामुळं बल्लापूरसह चंद्रपुरातील प्रत्येक महिला केवळ नारी नव्हे तर नारायणी बनण्याकडं आता वाटचाल करीत आहेत. आता माताभगिनींनी मुनगंटीवार यांना पाठिंबा असल्याचे फलकच उभारल्यानं बहिणींसाठी सातत्यानं झटणाऱ्या मुनगंटीवारांना ताईच्या प्रेमाची परतफेड करताना नारीशक्ती दिसत आहे.