BJP News : ब्रह्मपुरीच्या भूमीवरील एक आगळावेगळा सोहळा शनिवारी (ता. 27) चर्चेत आला, ज्यावेळी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी आमदार अतुल देशकर यांना खास शुभेच्छा दिल्या. देशकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ब्रह्मपुरीत कार्यकर्ता महाशिबिराचे आयेाजन करण्यात आले. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या कॉलेजकाळातील सरांच्या आठवणी सांगितल्या. त्यानंतर मुनगंटीवार आणि देशकर यांच्यातील स्नेहभाव किती जुना आहे, याचा अंदाज कार्यकर्त्यांना आला.
सुधीर मुनगंटीवार सरदार पटेल महाविद्यालयात शिक्षण घेत असताना अतुल देशकर हे त्याच महाविद्यालयात प्राध्यापक होते. मुनगंटीवार जरी देशकर यांच्या वर्गात नव्हते तरी कॉलेजमध्ये आपल्याला देशकर यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले, असे त्यांनी सांगितले. अतुल देशकर हे कतृत्ववान आहे असेही मुनगंटीवार यांनी नमूद केले. देशकर यांच्या शतकपूर्ती सोहळा साजरा व्हावा अशी माता महाकालीकडे प्रार्थना मुनगंटीवार यांनी केली .
कार्यकर्त्यांमध्ये जोश
लोकांची दिशाभूल करीत काँग्रेसने काही जागा मिळविल्या. चुकीचा काँग्रेस ‘नॅरेटिव्ह सेट’ करीत आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता या खोट्या प्रचारांना सत्याने प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात काँग्रेसचा खोटेपणा चालणार नाही. महायुतीचे सरकार नक्कीच येईल, असा ठाम विश्वास व्यक्त करीत मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
महायुतीचे सरकार कल्याणकारी योजना राबवित आहे. आपण आजच्या घडीला अर्थमंत्री नसलो, तरी राज्याच्या तिजोरीचा ‘पासवर्ड’ आजही आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही योजनेच्या पूर्ततेसाठी निधी कमी पडूच शकत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपूर आणि ब्रह्मपुरीच्या विकासासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही. त्यामुळे अतुल देशकर यांना आपली साथ असेल अशी ग्वाहीही मुनगंटीवार यांनी दिली. देशकर यांची स्तुती करताना जो करतो सेवाभाव, त्यांचेच नाव अतुलराव, असाही आवर्जुन उल्लेख केला.
वन विभागाने राबविलेल्या योजनेमुळे अनेक गृहिणींना घरगुती वापराचे गॅस सिलिंडर मिळाले. आपण मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केल्यानंतर आता वन क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या महिलांनाही मोफत सिलिंडरचा लाभ मिळणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आता बोनस मिळत आहे. हा बोनस महाविकास आघाडीचे सरकार देत नव्हते. यासंदर्भात आपण सरकारला विधिमंडळाच्या अधिवेशनात धारेवर धरले. तरीही त्यांनी बोनस देणार p धानाला प्रति हेक्टर 20 हजार रुपयांचा बोनस जाहीर झाल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
महायुती सरकारने शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले आहे. शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा मिळत आहे. परंतु महाविकास आघाडी आणि काँग्रेस लोकांमध्ये खोटा प्रचार करीत आहे. लाडकी बहिण योजना बंद होईल, अशी भीती दाखविली जात आहे. जगातील कोणतीही ताकद लाडकी बहीण योजना बंद करूच शकत नाही, असे मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले.