महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : देशाचे तुकडे करण्याचा विचार कराल तर याद राखा

Satara : सुधीर मुनगंटीवारांनी विरोधकांना दिला कडक इशारा 

ज्या जेएनयूमध्ये देशाचे तुकडे करण्याचा विचार मांडला जातो. तेथे आता महाराजांच्या इतिहासाचे, विचारांचे अध्ययन केले जाते. त्यासाठी आम्ही 10 कोटी दिले. जेथे देशाचे तुकडे करण्याचा विचार केला जाईल, तेथे महाराजांचे फक्त नावच काफी आहे, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी जातीवाद पसवणाऱ्यांना कडक इशारा दिला.  

5 नोव्हें 2022 रोजी एक नस्ती आमच्या समोर आली. अफजलखानाचं अतिक्रमण 1953 पासून आहे. पण दुर्दैवाने आपल्याच राज्यात महाराजांच्या पावन स्पर्शाने सोन्याच्या मोल्यवान मातीचे कण कण पवित्र झाले. अफजलखान लाखोचे सैन्य घेऊन आला. संकल्प करून आला ‘शिवा को जिंदा या मुर्दा पकडूंगा’. त्याचं उदात्तीकरण येथे होत होते. ५ मे २००८ ला महाराजांच्या भूमित अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय झाला होता. पण राज्याच्या सुदैवाने आणि त्यांच्या दुर्दैवाने मागितलेली कागदपत्र मिळू शकली नाहीत. म्हणून ते अतिक्रमण नियमित झालं नाही. 10 नोव्हेंबरला अतिक्रमण हटलं. दहशतवाद कसा संपवावा लागतो, हे समजले,, याला मुनगंटीवार यांनी उजाळा दिला.

49 ग्रामच्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. दृष्ट विचार त्याच्या पोटातून काढण्याचे काम महाराजांनी केले. काहींनी जुने फोटो दिले. वर्तमानपत्राची कात्रणे दिली. व्हिक्टोरीया अलबर्टचे फोटो पाठवले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने ही वाघनखं इथे आलीत, असं मुनगंटीवार म्हणाले. जिजाऊंनी बालशिवाजींना रामाच्या गोष्टी सांगितल्या. अयोध्येच्या दरवाजांसाठी महाराष्ट्रातील सागवन काष्ठ वापरले आहे, याचा आम्हाला अभिमान असल्याचेही ते म्हणाले.

राज्याभिषेक हा सरकारी कार्यक्रम होईल

निकोलस मर्चंट यांना मराठी समजत नाही. मी त्यांना विनंती करणार होतो की मंदिरात वाघनखं ठेवतो. पण ते आत्ताच परत घेऊन जातील. आपल्या साऱ्या वस्तू आमच्या महाराष्ट्रात याव्या अशी तिन्ही नेत्यांची इच्छा आहे, असंही ते म्हणाले. त्याचवेळी भविष्यात राज्याभिषेक हा सरकारी कार्यक्रम होईल, अशी घोषणा केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!