BJP News : काँग्रेसने दाखविलेली खोटी भीती आणि केलेल्या अपप्रचारामुळे मतदार अनेक ठिकाणी द्विधा मनस्थितीत सापडले. संविधान बदलले जाईल, मुस्लिमांचे अस्तित्व कायमचे संपविले जाईल अशा भीतीचा ‘पंजा’ काँग्रेसने मतदारांना दाखविला. आपल्याजवळ जणूकाही कुबेरच्या खजान्याची चावी आहे, असे चित्र निर्माण करण्यात आले. एकदा सत्ता आली तर कुबेराला सांगून आम्ही मतदारांना खटाखट..खटाखट.. टकाटक..टकाटक.. सारे काही द्यायला लावू, असे चित्र तयार करण्यात आले. त्याचा फटका भाजपचा बसला विशेषत: महाराष्ट्रात. अनेक ठिकाणी काँग्रेसने केवळ सहानुभूती व जातीच्या आधारावर निवडणूक जिंकली. त्यातील एक मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघ.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
एकेकाळी विकासापासून कोसो दूर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचा आता पूर्णपणे ‘मेकओव्हर’ झाला आहे. अतिशयोक्ती नाही, पण या सगळ्याचे श्रेय भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनाच द्यावे लागेल. आमदार झाल्यापासून त्यांनी विकासाची गंगा चंद्रपुरात आणण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले. अर्थमंत्री असताना तर त्यांनी चंद्रपूरचा कायपालटच करून टाकला. त्यानंतरही काँग्रेसने या भागातील मतदारांना सहानुभूती मिळावी म्हणून काही डोळ्यांमधील अश्रू दाखविले.
Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांच्या कामात दिरंगाई कराल तर खबरदार
प्रचंड विकास करणाऱ्या मुनगंटीवार यांना निवडणुकीत यश मिळू शकले नाही. पण अलीकडेच चंद्रपुरात झालेल्या विजय उत्सवातून सुधीर मुनगंटीवार यांनी आपण योद्धा आहोत. जय-पराजय आपल्यासाठी दुय्यम आहे. जेव्हापर्यंत श्वास सुरू आहे, तोपर्यंत चंद्रपूरच्या विकासासाठी रक्ताचा थेंब अन् थेंब वापरणारच, असे थेट वचनच दिले.
याला म्हणतात योद्धा
कोणतेही युद्ध म्हटले की जय-पराजय हा होणारच. परंतु पराजयानंतरही तितक्याच नम्रतेने मुनगंटीवार यांनी मतदारांचे आभार मानले. साडेचार लाख मतदारांनी जातीचे राजकारण, आरक्षणाबाबतच्या अफवा आणि सहानुभूती याकडे दुर्लक्ष केले. साडेचार लाख मतदारांनी मुनगंटीवार यांच्या विकासाचा ध्यासाला प्रतिसाद दिला. साडेचार लाख मतदारांनी त्यांना कौल दिला यात दुमतच नाही. एक युद्ध हरल्याने खरा योद्धा कधीही शस्त्र टाकून देत नाही. मुनगंटीवार हे तर विकासासाठी आक्रमकपणे काम करणारे लढवय्ये आहेत. त्यामुळे खऱ्या लढवय्या वाघाप्रमाणे त्यांनी पुढच्या युद्धासाठी आता रणशिंग फुंकले आहे.
आदरयुक्त भीती
सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल आमच्या मनात आदरयुक्त भीती आहे, असे महाविकास आघाडीची सत्ता असताना अनेक मंत्र्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात कबुली दिली आहे. एखादी विकासाची योजना हवी असेल, तर मुनगंटीवार इतका सकारात्मक पाठपुरावा करतात की, आम्हालाही त्यांनी सांगितलेली कामे करावीच लागतात असे अनेक मंत्र्यांनी कबूल केले. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार खासदार म्हणून संसदेत गेले असते, तर पुढच्या पाच वर्षात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील विकासाचे चित्रच वेगळे राहिले असते. पण चंद्रपुरात आता काय होऊ शकते याची चिंता सर्वांना वाटायला लागली आहे. अलीकडेच कर्नाटक एम्टामध्ये घडलेल्या प्रकारानंतर तर मतदारांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण वेळ आता निघून गेली आहे.
लोकसभेत असते तर..
महाराष्ट्रात मंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्राच्या अनेक योजना मतदारसंघात खेचून आणल्या आहेत. अशात ते थेट दिल्लीतच गेले असते, तर कोणकोणती कामे शक्य झाली असती हे त्यांनी विजय उत्सवात सांगितले.
Sudhir Mungantiwar : जेथे न पोहोचे डॉक्टर, तेथे पोहोचे ॲक्टर
बल्लारपूर ते मुंबई, बल्लारपूर ते पुणे थेट रेल्वेसेवा सुरू व्हावी अशी त्यांची इच्छा होती. मूर्ती येथील विमानतळावरून ‘टेकऑफ’ सुरू झाले असते. अशा अनेक कामांची यादी कदाचित त्यांच्याजवळ तयार असावी. ही कामे करणे मुनगंटीवार यांच्यासाठी अवघड नाही. सैनिक शाळा, बांबू संशोधन केंद्र, वन प्रशिक्षण अकादमी, गोंडवाना विद्यापीठ, आंतरराष्ट्रीयस्तराचे क्रीडा संकुल अशा अनेक योजना जर ते साकारू शकतात, तर दिल्लीत गेल्यावर ते काय नसते करू शकले.
‘मुमकीन’ झालेच असते
देशातील विकासाच्या बाबतीत जसे ‘मोदी है तो मुमकीन है’ असे ठामपणे बोलले जाते, अगदी तशीच परिस्थिती चंद्रपूरच्या बाबतीत आहे. चंद्रपुरात कोणताही विकास करायचा असेल तर ‘मुनगंटीवार है तो मुमकीन है’ ही वस्तुस्थिती आहे हे मतदारही मान्य करतात. अनेक गरजू रुग्णांना त्यांनी वेगवेगळ्या योजनांमधून जीवदान मिळवून दिले आहे. मतदारसंघाचा विकास केला, असे सांगून ते केवळ हवेत गोळीबार करीत नाहीत. केलेल्या प्रत्येक कामाचा डिजिटल, व्हिडीओ स्वरुपात ‘लेखाजोखा’ मुनगंटीवार मतदारांपुढे मांडतात. शब्द दिला की तो खरा करेपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत. विजय उत्सवातही त्यांनी ‘हार कर भी जितने वाले को बाजीगर कहते है..’ याचा प्रत्यय दिला. विकास कामांच्या बाबतीत शेवटच्या श्वासापर्यंत ‘थकुंगा नही, रूकुंगा नही’ असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
असे म्हटले जाते की, परिस्थिती अनुकूल असो की, प्रतिकूल जो स्वबळावर, कोणतेही कपटकारस्थान न करता युद्ध लढतो तो खरा योद्धा. सतत जनतेसाठी झिजत राहतो, तो खरा लोकनेता. अन् जो युद्धात आणि युद्धानंतरही प्रजेच्या सेवेत राहतो, तोच खरा कल्याणकारी राज्यकर्ता. मुनगंटीवार यांनी विजय उत्सवातील आपल्या भाषणातून हाच संदेश दिला की, ते कालही जनसेवक होते. आजही जनसेवक आहेत आणि भविष्यातही जनतेची सेवा करीत राहणार आहेत. त्यांची ही लढवय्या वृत्ती पाहून असेच म्हणाले लागेल की, ‘योद्धा वही हैं बड़े, जो हर हाल में लड़े.’
‘जमीन बंजर ना हो..’
अनेक वर्षांपूर्वी भारतात एक झाड उगवायला लागले. ते कुठून आले हे कोणालाच ठामपणे सांगता येणार नाही. हे झाड अनेक ठिकाणी दिसते. ते प्रचंड वेगाने वाढते. एकदा ते वाढले की समूळ उखडणेही कठीण असते, असे सांगितले जाते. का कोण जाणे या झाडाला काँग्रेस गवत असे नाव पडले आहे. या झाडाला केवळ काटेच असतात. झाडाचा काहीच सदुपयोग नाही असे तज्ज्ञ सांगतात. उलट ते पोषक जमिनीलाही पाण्याचे शोषण करून ‘बंजर’ बनवू शकते.
विजय उत्सवात मुनगंटीवार यांनी मतदारांना असाच एक संदेश दिला आहे. त्यामुळे सारेच विचारात पडले असावे व त्यांना आता चिंता वाटत असावी. ही चिंता म्हणजे जातीधर्माच्या आधारावर जे ‘बी’ पेरले जात आहे, त्याने मराठमोळ्या मातीत काँग्रेस गवत वेगाने वाढून ही जमीन ‘बंजर’ तर होणार नाही ना?