महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या वाघाची जगात डरकाळी

BJP Leadership : अव्याहत विकास कामाचा प्रचंड आवाका

Strongest Public Leader : सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असले तरीही, एका विधानसभेपुरते ते अडकले नाहीत. स्वतःच्या विधानसभेपासून विकासाची श्रृंखला सुरु करीत थेट राज्यात, देशात नंतर जगात महाराष्ट्राचा झेंडा फडकवला. त्यांनी केलेला संघर्ष वाखाणण्याजोगा आहे .छत्रपतींचा इतिहास जागतिक पातळीवर लख्ख व्हावा यासाठी 12 गडकिल्ले आणि स्थापत्य युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड कौतुकास्पद, अभिमानास्पद आहे. भारत-पाक सीमेवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणे, शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी लंडनसोबत सामंजस्य करार, जपानमध्ये महाराष्ट्राच्या प्रगल्भ संस्कृतिचा जागर, सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेचा झेंडा जगभरात ऊंचावला आहे.

आपल्या मतदारसंघासह समग्र महाराष्ट्राचा विकास घडवून आणणारे नेते बोटावर मोजण्याइतकेच आहेत. त्यापैकीच एक नाव आहे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार. महाराष्ट्र भाजपातील सर्वांत अनुभवी नेत्यांपैकी मुनगंटीवार हे एक. कामाचा प्रचंड आवाका, सखोल अभ्यास, उच्च शिक्षण, लोकांसाठी काही तरी वेगळे करण्याची तळमळ यामुळे सुधीर मुनगंटीवार हे नाव आज जगलाही माहिती झाले आहे. अगदी मृतप्राय विभाग जरी त्यांच्या हाती दिला, तरी मुनगंटीवार अशी काही कामे या विभागातून करून दाखवितात की अनेकांना प्रश्न पडतो, या विभागात करण्यासारखे एवढे होते?

देशाच्या नकाशावर महाराष्ट्राचा वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय विभाग अग्रस्थानी आहे. कट्टरातील कट्टर विरोधकांनाही हेवा वाटावा असे मुनगंटीवार यांचे व्यक्तीमत्व. प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध. पण जनतेचा प्रश्न असेल तर हे व्यक्तीगत संबंध बाजूला ठेवत ही मुलुखमैदानी तोफ नेहमीच विधिमंडळ आणि विधिमंडळाबाहेरही गरजताना दिसली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. दोन विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर पदवी असलेले मुनगंटीवार कोणत्याही मुद्द्याचा बारकाईने अभ्यास केल्याशिवाय न बोलणारे व्यक्तीमत्व. त्यातल्या त्यात त्यांनी एम. फिलची पदवीही संपादन केलेली. त्यामुळे मुनगंटीवार यांच्यासमक्ष अच्छे अच्छे अधिकारी जरा दचकूनच राहतात.

अव्याहत विकास

भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. 1995 मध्ये पर्यटन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर विकासाचा असा झंझावात त्यांनी सुरू केला, जो आपर्यंत अव्याहतपणे कायम आहे. वित्त व नियोजन मंत्री असताना महाराष्ट्राला सरप्लस अर्थसंकल्प देणारे सुधीर मुनगंटीवार एकटेच. वित्त विभागाला त्यांच्यामुळेच आयएओ मानांकन मिळाले. अपंग आणि निराधारांच्या अनुदानात त्यांरी भरीव वाढ केली. वनखात्याचा तर त्यांनी कायापालटच करून टाकला. अनेक विश्वविक्रम केले. हे करताना निसर्गाचा कधीही ऱ्हास होऊ दिला नाही. उलट 50 कोटींहून अधिक वृक्ष लागवडीचा विक्रम केला.

२०२२ मध्ये वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्रिपदाची जबाबदारी त्यांना महायुतीच्या (Mahayuti) सरकारमध्ये मिळाली. ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणण्याचा धाडसी नियम मुनगंटीवार यांनीच आणला. चंद्रपुरात देशातील सगळ्यात सुसज्त अशी वन अकादमी उभारली. वनरक्षण कायदे अधिक कडक केले. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या परिवाराला 25 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुनगंटीवार यांच्याच पुढाकाराचे फलित आहे. वनक्षेत्रालगत असलेल्या एक लाख शेतकऱ्यांच्या शेतीला कुंपणांचे संरक्षण दिले. दुर्मिळ प्राणी-पक्षांना राजाश्रय दिला. गोंदिया जिल्ह्याचा गौरव असणाऱ्या सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी विविध योजना सुरू केल्या.

Sudhir Mungantiwar : घाबरू नका, पूर्ण शक्तीने तुमच्या सोबत आहे !

नदी परिक्रमा

जल, जमीन आणि जंगल हा समन्वय साधणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी नदी परिक्रमा यात्रा हा अभिनव उपक्रम सुरू केला. नद्यांचे महत्व त्यांनी पटवून दिले. नागपूरमध्ये आधुनिक सुविधांनीयुक्त वन प्रशासन भवन झाले, ते मुनगंटीवार यांच्यामुळेच. वनसंपदा जतन करण्यासोबतच राष्ट्रकार्यात वनश्रींचे योगदान देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला गेला. अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी बल्लारपूरचे सर्वश्रेष्ठ काष्ठ, मोठ्या दिमाखात, भव्य शोभायात्रेसह त्यांनी प्रभुचरणी अर्पण केने. स्वतंत्र भारताच्या नव्या संसद भवनाच्या निर्मितीतही चंद्रपूरच्या काष्ठाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला.

उजळली चांदानगरी

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सियावर रामचंद्र की जयचा या दीपाक्षांनीही विक्रम केला. वृक्षांनी भारतमाता हा शब्द साकारत आणखी एक गिनेस विक्रम नोदविला. त्यामुळे चंद्रपूरचे नाव पुन्हा जगाच्या नकाशावर चमकले. सीता मातेच्या हरणाच्या वेळी जटायू पक्षाने आपल्या प्राणांची बाजी लावली. त्या जटायूच्या लुप्त होत असलेल्या प्रजातींना वाचविण्यासाठी प्रायोगिक दहा जटायू पक्षी ताडोबाच्या जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले. केंद्र सरकारच्या ‘फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया’च्या पाहणी अहवालानुसार महाराष्ट्रात दोन लाख स्क्वेअर किलोमीटरने वनक्षेत्रात वाढ झाली. कांदळवनातही 102 स्क्वेअर किलोमीटरची वाढ झाली. कांदळ वनांबाबती मुनगंटीवार यांनी तयार केलेल धोरण आता केंद्र सरकारनेही स्वीकारले आहे.

सांस्कृतिक कार्य विभागातही मुनगंटीवार यांनी जान आणली. महाराष्ट्राला स्वतःच राज्यगीत मिळाले. कविवर्य राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे ते गीत. ऐतिहासिक गौरव स्थळांच्या देखरेखीची, डागडुजीची, संवर्धनाची जबाबदारी केंद्रीय पुरातत्व खात्याकडे होती. त्यामुळे येथे काम करताना अनेक अडचणी येत होत्या. सुधीर मुनगंटीवार यांनी सतत पाठपुरावा केला. केंद्राकडून डिनोटिफायचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्राच्या इतिहासाचा वारसा चीरतरूण ठेवण्याचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला.

याला म्हणतात शिवसेवा

छत्रपती शिवाजी महाराजांवरील खरी श्रद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी दाखवून दिली. अफजल खानाचा वध शिवरायांनी प्रतापगडावर केला. तोच प्रतापगड अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला होता. मुनगंटीवार यांनी कोणतीही तमा न बाळगता गडावर धडक मोहिम सुरू केली. अतिक्रमण हटविण्यात आले. ‘खानाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही’, असे खडे बोलही त्यांनी टिका करणाऱ्यांना सुनावले.

स्वराज्याची राजधानी रायगड येथे छत्रपती शिवरायांचा 350वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा झाला. हा नेत्रदीपक सोहळा अख्ख्या जगातील शिवप्रेमिंनी अनुभवला. ‘शिवकालीन होन’ हे विशेष टपाल तिकिट निघाले. सांस्कृतिक कार्य विभागाकडून विशेष लोगोही तयार करून घेतलर.

शासनाच्या प्रत्येक कार्यात हा लोगो आता वापरण्यात येत आहे. राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या विशेष टपाल तिकिट काढण्यात आले. बुलढाण्यातील (Buldhana) त्यांच्या जन्मस्थळाचा विकास आराखड्याची मुहूर्तमेढ रोवली. क्रांतीवीर शिवराम हरी राजगुरू यांच्या पुण्यातील (Pune) घराला हुतात्मा स्मारक म्हणून विकसित करण्यासाठी शासनाकडून 254 कोटी रूपयांचा आराखडा मंजूर करून घेतला, तो मुनगंटीवार यांनीच.

Sudhir Mungantiwar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांची प्रतीक्षा संपली

महाराजांचा खरा सन्मान

छत्रपती शिवरायांचा आग्र्याच्या किल्ल्यात अपमान करण्यात आला होता. त्याच दिवाण-ए-आम परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दणाणला. हे धाडस करणारेही सुधीर मुनगंटीवारच. स्वराज्याच्या इतिहासाची छाप मनावर कोरली जावी यासाठी जाणता राजा या नाट्याचे प्रयोग राज्यभरात सादर करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील 12 गडकिल्ले आणि ऐतिहासिक वास्तुंसाठी पुढाकार घेतला. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे केंद्र सरकारमार्फत त्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होत आहे.

भारत-पाक सिमेवरील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ऊभारला गेला. हा पुढाकारही सुधीर मुनगंटीवार यांचाच. थेट ब्रिटिश सरकारसोबत शिवरायांची वाघनखे आणण्यासाठी सहकार्य करार केला. लंडनमध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा ऊभारण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. जपानमध्ये महाराष्ट्राच्या प्रगल्भ संस्कृतिचा जागर केला. त्यातून मराठी बाणा काय असतो, हे जगाला दाखवून दिले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरणही तयार केले. महाराष्ट्र भूषण मानकऱ्यांना मिळणारे मानधन वाढवून 25 लाख करून घेणारे मुनगंटीवारच.

चित्रिकरणासाठी लागणाऱ्या सर्व परवान्यांसाठी ‘वन विंडो सिस्टिम’ सुरू केली. मराठी नाटकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृह ऊभारणीचा निर्णय घेतला. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे अनुदान दुप्पट केले. प्रेरणादायी चित्रपटांना एक कोटी किंवा त्याहून अधिक अनुदान जाहीर केले. योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंताच्या निवृत्ती वेतनासाठी मुनगंटीवार आता आत्मियतेने पडताळणी करीत आहेत. याशिवाय महाराष्ट्राची साहित्य संपदा, ऑडिओ बुकच्या माध्यमातून जगापुढे येत आहे.

‘मत्स्य’ला नवसंजीवनी

महाराष्ट्राचा मत्स्य व्यवसाय विभाग फारसा सामान्यांना ठाऊक नव्हता. परंतु मुनगंटीवार यांनी केलेल्या कार्यातून आता हा विभागही उल्लेखनीय ठरत आहे. सागरी प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सागरी मासेमारीची मर्यादा बारा नॉटिकल माइल्सच्या पुढे वाढविली. मच्छीमाराच्या संरक्षणासाठी दोन स्पीड बोटची सोय केली. कोळी बांधवांना डिझेल परताव्याची सात वर्षांची रक्कम अदा करण्यात आली. मास्त्योत्पादन वाढीसाठी विविध करार झाले. केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्र्यांसोबत संवाद साधला. ससून डॉकचे आधुनिकीकरण आणि मुंबई जवळील सातपाटी बंदरावर अत्याधुनिक फिश मार्केट उभारण्याचे काम हाती घेतले.

Sudhir Mungantiwar : एकही लाडकी बहिण योजनेतून सुटणार नाही

चंद्रपुरातही विकासगंगा

शिक्षणाच्या सोयीसाठी अंगणवाड्या आधुनिक केल्या. इंजिनीअरिंग कॉलेज अद्ययावत करून घेतले. चंद्रपुरात आरोग्य सेवा सुधारल्या. चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात सुविधांमध्ये वाढ केली. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने आधुनिक कॅन्सर हॉस्पिटलही पूर्णत्वाकडे आहे. मूल आणि बल्लारपूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सुविधा वाढ झाली. हॉस्टेल, मेस, ट्रेनिंग सेंटरचा मार्ग प्रशस्त झाला. जिल्ह्यात तब्बल 14 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती उभारल्या गेल्या.

स्मार्ट अंगणवाडी साकारल्या गेल्या. अभ्यासिका, वाचनालय सुरू झालेत.सुसज्ज क्रीडांगणांची श्रृंखला तयार केली. राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे भव्य, नियोजनबध्द आयोजन केले, ते सुधीर मुनगंटीवार यांनी. मिशन सेवा, मिशन शक्ती, मिशन शौर्य असे उपक्रम सुरू केले. चंद्ररपूरमध्ये देशातली सर्वोत्तम सैनिकी शाळा सुरू केली. चंद्रपुरातील रस्ते, वीज, पाण्याच्या प्रश्नावर भरीव काम केले. बल्लारपूर येथील बस स्थानकाचा कायापलट केला. त्याची चर्चा संपूर्ण देशात झाली. चंद्रपूर आणि बल्लारशा रेल्वे स्थानकही देशात नावारूपाला आली. पाण्यासाठी अमृत एक, अमृत दोन, हर घर जल योजना, स्थानिक पाणीपुरवठा योजना, आरओ यंत्र आणि एलईडी लाइट्सेन गावे प्रकाशमान केली ती मुनगंटीवार यांनीच.

रोजगार निर्मिती

रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी बीआरटीसी, भाऊ अर्थात बांबू हॅन्डिक्राफ्ट अॅन्ड आर्ट युनिट सुरू झाले. बांबूपासून कलात्मक वस्तू तयार होऊ लागल्या. लोकांच्या हाताला मुनगंटीवार यांनी रोजगार मिळवून दिला. चंद्रपूरमध्ये अगरबत्तीग, टुथपिकग, डायमंड कटिंग प्रशक्षण केंद्र, कार्पेट, मध संकलन, महिलांची पोल्ट्री कंपनी असे उद्योग सुरू झालेत. अॅडव्हान्टेज चंद्रपूर या इंडस्ट्री एक्स्पोतून 75 हजार कोटींचे सहकार्य करार झाले. नव्या उद्योग उभारणीतून रोजगाराच्या वाटा प्रशस्त केल्या त्या मुनगंटीवार यांनीच. आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यासाठी ‘चांदा अॅग्रो’चे आयोजन केले. वरोरा येथे साकार होणारे कृषी तंत्रज्ञान केंद्र आणि चंद्रपुरातील मूल येथील कृषी विज्ञान केंद्र मोलाचे ठरेल.

सीएसआर जर्नल्सच्यावतीने सुधीर मुनगंटीवार यांना ‘चँपियन्स ऑफ गुड गव्हर्नंस’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिला शब्द केला पूर्ण हे मुनगंटीवार यांचे ब्रीद. एक तर शब्द देत नाही. दिला तर तो पूर्ण केल्याशिवाय राहात नाही, असे शब्दाला जागणारे राजकारणी दुर्मिळच असतात. असेच एक दुर्मिळ व्यक्तीमत्व म्हणजे विदर्भाचे भूमीपूत्र सुधीर मुनगंटीवार, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!