Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग धरला आहे. सर्व उमेदवार आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. यासाठी विविध क्लुप्त्या लढवल्या जात आहेत. विविध साधनांसह सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. अशात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दुचाकीला पसंती दिली आहे.
मुनगंटीवार यांना नेरी दुर्गापूर येथील कार्यकत्यांनी आग्रह केला आणि ते लगेच कार्यकर्त्याच्या दुचाकीवर स्वार झाले. शहरातील लहान मोठ्या रस्त्यांवरून त्यांची दुचाकी रॅली निघाली. मतदारांच्या थेट भेटी त्यांनी घेतल्या. या रॅलीतही लोकांनी त्यांना आपल्या समस्या, काही कामे सांगितली. त्यांच्या सहकाऱ्यांनी ती नोंदवून घेतली. असे करत करत रॅली पुढे जात होती आणि रॅलीमध्ये जुळणाऱ्यांची संख्या वाढत गेली.
विरोधकांकडे सांगण्यासारखी कामे नाहीत. अन् सुधीर मुनगंटीवार यांना केलेली कामे सांगण्यासाठी वेळ पुरत नाही. त्यांनी केलेल्या कामांची यादी एवढी मोठी आहे. त्यांचे कार्यकर्ते भाजप महायुती सरकारने केलेली कामे मतदारांना सांगत आहेत. पण ‘आम्हाला सांगायची काही गरज नाही. आम्हाला सर्व माहिती आहे. कारण जे डोळ्यांनी दिसते, ते सांगायची गरज नाही’, असे उत्तर कार्यकर्त्यांना मतदारांकडून मिळत आहे.
Pombhurna : तर 100 ॲम्बुलन्स कमी कराव्या, असं का म्हणाले मुनगंटीवार ?
एमआयडीसीची सोय झाली
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या मुल येथे सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सर्व सोयींनी युक्त अशी एमआयडीसी उभारली. आज तेथे उद्योगांची रेलचेल आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. हे कमी होते की काय म्हणून शेजारचा मतदारसंघ असलेल्या ब्रम्हपुरीचे आमदार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही मुल एमआयडीसीत इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास कामांचे आकर्षण त्यांच्या विरोधकांनाही आहे. याचे आणखी एक उदाहरण यानिमित्ताने बघायला मिळाले.