प्रशासन

Tumsar ITI : शासन किती दिवस ठेवणार प्रभारी?

Student's Got Angry : प्राचार्य नसल्याने शैक्षणिक कामकाजावर परिणाम

Education Department : भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) दोन वर्षांपासून पूर्णवेळ प्राचार्य नाही. त्यामुळे सरकारने ही संस्था पूर्णपणे वाऱ्यावर सोडली की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संस्थेत वरिष्ठ अधिकारीच नसल्याने प्रशिक्षणार्थी आणि शिक्षकांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. दररोजच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी वरिष्ठ उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. 

तुमसर येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. संस्थेत विविध प्रकारचे आठ व्यवसायिक अभ्यासक्र चालतात. संस्थेत 400 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. याठिकाणी सुमारे 18 नियमित व कंत्राटी शिल्पनिदेशक कार्यरत आहेत. भांडारपालपद अनेक वर्षांपासून रिक्त आहे. संस्थेत शासनाच्या नियमाप्रमाणे प्राचार्य नियुक्त आहे. जवळपास 2022 पासून या संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. ही शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे.

अनेक पदं रिक्त

आयटीआय मधील भांडारपाल पद देखील रिक्त आहे. त्यामुळे या विभागातील कामे प्रलंबित आहेत. संस्थेचा कारभार पाहणारे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालयाचे कार्यालय 32 किलोमीटर अंतरावर आहे. सद्य:स्थितीत या संस्थेत प्रभारी प्राचार्य कार्यरत प्रभारी प्राचार्य आठवड्यातून येथे एकदा येतात. त्यांच्या अनपुस्थितीत व्यवस्था सांभाळण्यासाठी समन्वयक नेमून दिलेला आहे. परंतु या समन्वयकांना कोणतेही कायदेशीर अधिकार नाहीत. शिक्षक नियमित येतात की नाही हे तपासण्याचे अधिकार त्यांना नाहीत. शिक्षक विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवितात की नाही यावर ते देखरेख ठेवू शकत नाहीत. शिक्षकांना येणाऱ्या अडचणी कोण सोडविणार असा प्रश्न आहे.

Gram Panchayat : भंडाऱ्यात ग्रामसभा बनल्या फार्स..

संस्थेतील दैनंदिन शासकीय कामकाज रामभरोसे चालत आहे. विद्यार्थी शिक्षकांना जुमानत नसतील तर त्यांची तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न आहे. शिक्षकांच्या तातडीने रजा मंजुर करायची असल्यास अडचण येते. अतिमहत्त्वाच्या कागदपत्रांवरील स्वाक्षरी अडतात. विद्यार्थ्यांना तातडीचे लागणारे कागदपत्रे आणि त्यावरील स्वाक्षरी मिळविण्यासाठी अनेक दिवस प्रतिक्षा करावी लागते. अशा अनेक कामांसाठी संस्थेच्या कार्यालयात पूर्णवेळ प्राचार्य असणे अत्यंत आवश्यक आहे.

आयटीआयमध्ये समन्वयक असले तरी त्यांना प्रचार्यांचे अधिकार नाहीत. मुख्यालयाकडून येणारी तातडीचे शासकीय आणि गोपनीय कागदपत्रे हे प्रचार्यांच्याच नावाने येतात. हे कागदपत्र पाहण्याचे अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे पत्रव्यवहारही थांबून असतात. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढ्या मोठ्या शासकीय संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य न मिळणे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालयाचे अपयश मानले जात आहे.

तुमसर आयटीआय मध्ये नियमित प्राचार्यांची तातडीने नेमणूक होणे आता गरजेचे झाले आहे. यासाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. आयटीआयचे केंद्र प्रमुख संजू लोहे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विजय लाखडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक ओमप्रकाश इप्पर, शिल्पनिदेशक लक्ष्मण बाचकर, अश्विन बनकर, विशाल धंडारे, प्रशिक्षणार्थी विशाल क्षिरसागर, अनमोल राऊत, हिमांशू वंजारी, रेश्मा ढेंगे, अमोल शिवरकर, शिवानी उंदिरवाडे, साहिल शेळके, प्रशांत मस्के उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!