महाराष्ट्र

Shivaji Maharaj Statue : शिल्प निर्मितीचा फसलेला प्रयोग

Malvan Rajkot : पुतळा प्रकरणाचे राज्यभर तीव्र पडसाद

या लेखात प्रकाशित मते ही लेखकांची आहेत. या मतांची द लोकहित सहमत असेलच असे नाही.

 

Target BJP Government : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्य दैवत. तेज, शौर्य, कर्तृत्व, विवेक, न्याय प्रियता या सर्व चांगल्या गुणांचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. समस्त भारतीयांच्या हृदयात रयतेचा राजा म्हणून कोरले गेलेले अद्वितीय नाव म्हणजे शिवछत्रपती. सारेच त्यांना प्रेरणास्थान मानतात. राजे शिवछत्रपतींनी आखून दिलेल्या आदर्श तत्त्वानुसार आपण राज्यकारभार चालवू. छत्रपती शिवराय आपले आदर्श आणि मार्गदर्शक आहेत. सर्वच राजकीय नेते आपल्या भाषणातून हमखास हे बोलताना दिसतात. वास्तवात मात्र वेगळे चित्र बघावयास मिळते.

केवळ झगमगाट आणि प्रसिद्धीच्या वलयात अडकलेली राजकारणी आणि स्वार्थी माणसे आता राष्ट्रपुरुषांच्या नावाचा स्वतःच्या स्वार्थासाठी जयघोष करताना दिसत आहेत. महापुरुषांचे आदर्श विचार ते कितपत अंगिकारतात हा प्रश्नच आहे. आता तर काही नवखे आगळेवेगळे प्रयोग करत आहेत. आपण कुणावर प्रयोग करत आहोत, याचे भान त्यांना राहत नाही. एका नवख्या शिल्पकाराने अल्पावधीत बनवलेला

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. केवळ दिखावा तसेच इव्हेंट साजरा करण्यात धन्यता मानणाऱ्या राजकीय नेत्यांचे पितळ उघडे पडले. राष्ट्रपुरुषांचे पुतळे इतिहास सांगतात. राष्ट्रप्रेमाची ज्योत ह्रदयात तेवत ठेवतात. ते आपले प्रेरणास्त्रोत असतात.

असेही राजकारण

अशा थोर महापुरुषांचे पुतळे आपणास ठिकठिकाणी बघावयास मिळतात. अनुभवी आणि ज्येष्ठ शिल्पकार अत्यंत तन्मयतेने, चिकाटीने आणि श्रद्धापूर्वक या पुतळ्याची निर्मिती करतात. वर्षानुवर्षांपासून दिमाखात उभे असलेले असंख्य पुतळे अजून सुस्थितीत आहेत. महाराष्ट्रात अनेक अनुभवी शिल्पकार आहेत. देशभरात त्यांचा नावलौकिक आहे. या सर्वांना डावलून एका नवख्या शिल्पकाराकडून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला.

पुतळा कोसळल्याने आता या निर्मितीमागच्या सर्व बाबींचा उहापोह होत आहे. अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहोचविण्याचा हा प्रकार आहे.

भारतात सर्वच क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान, तंत्रज्ञ तसेच तांत्रिक साधने उपलब्ध आहेत. विविध क्षेत्रात मोलाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींची कमतरता नाही. असे असताना पुतळा वाऱ्याच्या झोताने पडला, हे सांगेणे म्हणणे निव्वळ हास्यास्पद आहे. या प्रकरणी सर्व जबाबदारी नौदलावर झटकण्याचा प्रकार कुणासही पटण्यासारखा नाही. या महत्वाच्या कार्याकडे कुणी गांभीर्याने बघितले नाही. अक्षम्य दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा केला असे दिसते. त्यामुळे पुतळा निर्मितीत सहभागी असणाऱ्या यंत्रणा आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. राजकीय फायद्यासाठी हट्टाने हे स्मारक उभारले काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

भान राखावे

महान व्यक्तींच्या शिल्पामागे इतिहास आणि अस्मिता असते याचे भान राखणे आवश्यक ठरते. असे शिल्प केव्हाही काल्पनिक कलाकृती नसते. महापुरुषांचे शिल्प साकारताना खूप काळजी घ्यावी लागते. अशा अजरामर कलाकृतींना गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणीही खपवून घेता कामा नये. क्षुल्लक हितसंबंध जोपासण्यासाठी कुणी काही अनुचित करत असेल, तर त्याला तिथेच अद्दल घडविली पाहिजे.

ब्रान्स धातुचे शिल्प ही टिकणारी कलाकृती आहे. चांगले शिल्प साकारयला पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. इथे हा पुतळा अनुभव तसेच अभ्यास नसलेल्या नवशिक्याकडून बनविण्यात आला. त्याने अल्पावधीत तो तयार केला. विशेष म्हणजे आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्याचे लोकार्पण केले होते.

सिंधुदुर्गातील मालवण राजकोट येथील पुतळा तो कोसळला. ही घटना वेदनादायी आहे. आता राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांवर टिकेची झोड उठवली जात आहे. या विषयावरून राजकारण सुरू आहे. वेगवेगळे आरोप होत आहेत. याप्रकरणी जनसामान्यांच्या भावना तीव्र आहेत. जनमानसातील आपली प्रतिमा टिकवून ठेवण्याचे नवे आव्हान महायुती समोर उभे ठाकले आहे. किल्ल्यावर बांधलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने विरोधकांना सरकारवर टिका करण्याची आयती संधी मिळाली आहे.

महाविकास आघाडीने सरकारच्या कारभारावर आसूड ओढले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. रायगड किल्ल्यावर उद्धव ठाकरे आणि नारायण राणे समर्थकांत वाट रोखल्याने राडा झाला. हाणामारी तसेच दगडफेक करण्यात आली. एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘पेंग्विन.. पेंग्विन..’ या घोषणेला कोंबडीचोर.. कोंबडीचोरने प्रत्युत्तर देण्यात आले. जयंत पाटील यांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. मराठी माणसे राजकीय वैमनस्यातून आपसात भिडल्याने दुर्दैवी चित्र किल्ले रायगडावर बघायला मिळाले.

व्हायरल व्हिडीओ

राजगडावरील घटनेवरून महाविकास आघाडीतर्फे एक व्हिडीओ काढण्यात आला आहे. या व्हिडीओतून विरोधकांनी छत्रपतींची माफी मागत त्यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांचा शेवट केल्याशिवाय स्वस्थ न बसण्याचा निर्धार बोलून दाखविला आहे. महाराज सिमेंटमध्ये जान असून चालत नाही, काम करणाऱ्यांच्या रक्तात इमान पाहिजे, अशी लय भारी वाक्ये यात आहेत. पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे रविवारी सरकारला जोडेमारो आंदोलन पुकारण्यात आले. अल्पावधीत पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यात संतापाची भावना आहे. झालेल्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) तसेच भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जनतेची माफी मागितली आहे. पण शिवप्रेमी त्यांना माफ करणार का, हा प्रश्न आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!