महाराष्ट्र

Maharashtra Assembly : ‘हिट अॅन्ड रन’वरून चढला पारा, पुणे प्रकरणावरून संतापले वडेट्टीवार

Vidhan Sabha : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले विरोधकांना प्रत्युत्तर

Hit & Run Case : महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी (ता. 27) पासून सुरू झाले आहे. शुक्रवारी (ता. 28) विधिमंडळात खऱ्या अर्थाने कामकाजाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लक्षवेधीपासून कामकाजाला सुरुवात झाली. पुणे पोर्शे कार आणि ड्रग्स प्रकरण शुक्रवारी अधिक चर्चेत आले. या दोन्ही प्रकरणाचा आधार घेत विरोधी पक्ष नेते विजय वटेट्टीवार यांनी सरकारला चांगले धारेवर धरले. या प्रकरणांमध्ये सखोल चौकशी करत दोशींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

वटेट्टीवारांनी सांस्कृतिक ओळख असलेल्या पुण्याचा ‘उडता पंजाब’ होत असल्याचा टीका केली. पोर्शे कार प्रकरणात कारच्या वापराबाबत परिवहन विभागाचा हलगर्जीपणा त्यांनी यावेळी अधोरेखित केला. संबंधित गाडी सहा महिने बिना क्रमांकाची चालत होती. पेालिस आणि आरटीओच्या नजरेतून बिना नंबरची वाहने सुटतातच कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ससून रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावरील वटेट्टीवारांनी ताशेरे ओढले. ससून रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

पब आणि वसुली

पुणे पब ड्रग्स प्रकरणावर बोलताना वटेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरले. पुण्यातील पब आणि होणारी बसुलीवर त्यांनी टीकास्त्र डागले. पुण्यात 450 ‘ओपन टेरेस बार’ आहेत. त्यांच्याकडून पाच लाख रुपये हप्ता घेतला जातो. छोटेमोठे होटेल 75 हजार ते अडीच लाख देतात. पबकडून पाच लाख रुपये हप्ता घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पुण्यातील 27 पब अनधिकृत आहेत. पोलिस आयुक्तांना याची माहिती नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. पोलिस आयुक्तांनी 200 गुंडांची ओळख ‘परेड’ घेतली. ही ‘परेड’ होती की, त्यांच्याशी ओळख असा सवालही वटेट्टीवार यांनी केला. छत्रपती संभाजीनगरातूप आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणात सेटलमेंट करणाऱ्या दलालाची चौकशी करावी असे ते म्हणाले. यात वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याची टीकाही त्यांनी केली.

दारूचा महापूर

पुण्यात ‘नॉनटीपी’च्या दारूचा महापूर आल्याचे वडेट्टीवार म्हणाले. या मद्यविक्रीमुळे महसूल बुडत आहे. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे असेही ते म्हणाले. याप्रकरणाची चौकशी केल्यास 700 ते 800 कोटींचा महसूल सहज जमा होईल. दारू, गुटखा पबचे हप्ते ठरवले जात आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तांना राजीनामा घ्यावा. बिना नंबर वाहनाबाबत आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही वडेट्टीवार यांनी केली. वडेट्टीवार यांच्या निवेदनानंतर माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार अनिल देशमुख यांनीही सरकारवर टीका केली. देशमुख म्हणाले नागपुरात अशा अनेक घटना घडल्या आहेत.

Maharashtra Assembly : फडणवीसांनी थोपटली अमितेश कुमारांची पाठ

सात तासांनंतर कारवाई

नागपुरातील प्रकरणामध्ये पोलिसांनी सात तास हलगर्जीपणा केल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख्या यांनी केला. याप्रकरणात तातडीने नमूने घ्यायला हवे होते. कारचालक महिलेला सोडून देण्यात आले. पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांची गळाभेट घेतली. विना सुपुर्दनाम्यावर वाहन सोडून देण्यात आल्याचा आरोपही देशमुख यांनी केला. काही प्रकरणांमध्ये आपण स्वत: पेालिस आयुक्तांना भेटल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अनिल देशमुख यांनी सभागृहात सांगितले.

नागपूर पोलिसांनी स्वत: कारवाई करायला हवी होती. नागपुरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. काही प्रकरणात तीन दिवसांनंतर रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले. गंभीर घटनांमध्ये पोलिस हलगर्जीपणा करीत असल्याची टीका देशमुख यांनी केले. केवळ अधिकाऱ्यांना निलंबित करून काही होणार नाही, असे ते म्हणाले. ‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित कुटुंबाला भेटावे, अशी मागणीही देशमुख यांनी केली. ममता अदमाने यांना सरकारने आर्थिक मदत करावी, असेही ते म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!