देश / विदेश

PM Oath Ceremony : राष्ट्रपती भवनातील ‘तो’ बिबट्या की…?

Modi 3.0 : शपथविधी सोहळ्यामध्ये कॅमेऱ्यात कैद झाला अजब प्राणी

New Delhi : रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींसह त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याची जेवढी चर्चा देशभर आहे. तेवढीच चर्चा आता शपथविधी सोहळ्यातील एका व्हिडिओ क्लिपची होत आहे. एका मंत्र्याच्या शपथविधी दरम्यान राष्ट्रपती भवनात एक अजब प्राणी कॅमेऱ्यात कैद झाला.

शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण 72 मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान यावेळी एका मंत्र्यांच्या शपथविधी दरम्यान मागे एक प्राणी फिरताना कैद झाला आहे. हा गूढ प्राणी अत्यंत सहजपणे फिरत होता. पण चित्र स्पष्ट नसल्याने तो नेमका कोणता प्राणी होता या चर्चांना उधाण आले आहे. भाजपाचे नवनिर्वाचित खासदार दुर्गा दास यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद आणि गोपनीयतेची शपथ देत होत्या. यावेळी शपथ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सही केली. त्यानंतर ते अभिवादन करण्यासाठी उठले असता मागे एक प्राणी चालताना दिसत आहे.

राष्ट्रपती भवनात एनडीएचा काल शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी 8 हजार पाहुणे उपस्थित होते. यामध्ये अनेक देशांचे नेते, उद्योजक, बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये आमंत्रित न करण्यात आलेला एक प्राणी दिसत आहे.

PM Oath Ceremony : शपथ घेताना चंद्रशेखर पेमसानींनी टाळले देवाचे नाव

सामाजिक माध्यमांवर व्हिडिओची चर्चा..

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे नेटकरी वेगवेगळ्या शंका उपस्थित करत आहेत. तो बिबट्या होता का? की मांजर किंवा कुत्रा होता? अशा शंका नेटकरी मांडत आहेत. मात्र याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. आणि राष्ट्रपती भवनसारख्या ठिकाणी जिथे कडेकोट सुरक्षा असते तिथे थेट मंचावर प्राणी पोहोचल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे ‘हे एडिट केले आहे की काय? हे कोणाच्या लक्षात कसे आले नाही. मोठ्या मांजरासारखं दिसत आहे, असं एका युजरने म्हटलं आहे. शेपटी आणि चालण्यावरुन तो बिबट्या वाटत आहे. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रपती भवनाकडून अधिकृतपणे काही माहिती देण्यात आलेली नाही

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!