NCP Vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना विनाकारण संभ्रम पसरवू नये असा सल्ला दिला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पराभव समोर दिसत असल्याने तुतारीचा आवाज निघत नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले अनिल देशमुखांसारखे नेते खालच्या पातळीवर जाऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकेकाळी अनिल देशमुख सुद्धा आमच्यासोबत येणार होते. त्यांना मंत्रीपद हवे होते. भाजपने त्यांना नकार दिला. त्यामुळे अनिल देशमुख आले आहेत, अशी टीकाही सुनील तटकरे यांनी केली. तसेच,महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याला गंभीरपणे घेण्याची गरज नाही. ज्यांना स्वतःच्या मतदारसंघात ओळखले जात नाही. आमच्यावर 70 हजार कोटींचा आरोप केले जात होता, त्याला आज फडणवीसांनी फुल स्टॉप दिला आहे, असेही तटकरे म्हणाले.
नाशिकच्या दौऱ्याचा किस्सा सांगताना..
नाशिक दौऱ्यावर असताना हॉटेलला वॉशरुमसाठी गेलो. तीन चार मिनिटे थांबलो. सुदैवाने तिथे त्यांच्या कार्यालयात काम करणारा दत्ता नावाचा हेमंत टकले यांच्या गाडीचा चालक भेटला. तो रायगड लोकसभा मतदारसंघातील रोहा येथील होता. त्याला शरद पवार यांचा पीए सुनील रानडे याने फोनवर माझ्या विरोधात मतदान करायला सांगितले असे त्याने सांगितले.
Bhandara Gondia Constituency : निवडणुकीचा उत्सव संपताच व्यवसायिकांची कमाई घटली
परंतु माझ्या गावात अनेक विकासकामे अदिती तटकरे आणि तुम्ही केली असल्याचे त्यांना सांगितले. शिवाय 95 टक्के मतदान तुम्हालाच होणार असल्याचे रानडे यांना ठणकावून सांगितल्याचे दत्ताने सांगितले. विकृत मनोवृत्तीचा केला जाणारा हा प्रचार थांबवावा. अशी वैफल्यग्रस्त विधाने करत असताना खोटेपणाचा कळस कसा असू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझ्यासंदर्भात अनिल देशमुख यांनी केलेले विधान आहे असेही सुनील तटकरे म्हणाले.
अखेरच्या टप्प्यातील मतदान
महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यातील नाशिक आणि पालघर या दोन लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते, नाशिकमधील सर्व विधानसभा सदस्यांची बैठक घेऊन पक्षाची महत्वपूर्ण भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडली. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, गिरीश महाजन यांच्याशीही चर्चा झाली. महत्वपूर्ण नियोजन करण्याच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण क्षमतेने दोन्ही लोकसभा मतदारसंघात काम करत आहे असेही सुनील तटकरे यांनी सांगितले.