महाराष्ट्र

Voting Percentage : अकरा उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला जास्त मते

NOTA : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील स्थिती

Lok  Sabha Election : निवडणुकीत उभ्या राहिलेल्या एकाही उमेदवाराबद्दल मतदार समाधानी नसेल तर त्याला ‘नोटा’ला मत देण्याचा पर्याय आहे. पण कधीकधी मतदार उमेदवारांपेक्षा ‘नोटा’लाच अधिक पसंती दर्शवितात. असाच काहीसा प्रकार जळगाव आणि रावेर मतदार संघातही दिसून आला. या दोन्ही मतदार संघात मतदारांनी लोकसभेच्या रिंगणात असलेल्या 11 उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला जास्त मते दिल्याची माहिती पुढे आली आहे. दोन्ही मतदारसंघांत 18 हजार 10 मते ‘नोटा’ला मिळाली.

नोटा (वरीलपैकी एकही नाही) पर्याय, जो मतदारांना उमेदवारांबद्दलची नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार देण्यासाठी 2013 मध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आला होता. त्याने अनेक अपक्ष उमेदवारांपेक्षा अधिक मते मिळविली आणि काही मतदार संघांमध्ये मतदान झालेल्या मतांपेक्षाही जास्त मते मिळवली. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारांच्या मतांची एकूण मागे टाकून ‘नोटा’ ने जास्त मते मिळविली आहेत.

जळगावमध्ये ‘नोटा’ला 13 हजार 910, तर रावेरमध्ये 4 हजार 100 मते मिळाली. दोन्ही मतदारसंघांत 18 हजार 10 मते ‘नोटा’ला मिळाली आहेत. ‘नोटा’ला मिळालेल्या मतांच्या तुलनेत दोन्ही मतदारसंघातील 11 उमेदवारांना त्यापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. 902 ते 2000 हजार मते मिळविणाऱ्यांची संख्या सहा आहे. उमेदवार श्रीराम ओंकार पाटील यांना 749, डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते यांना 902, अमित हरिभाऊ कोलते 981, शे.आबीद शे.बशीर 1040 तर संदीप युवराज पाटील 1108 मते मिळाली आहे.

Mahayuti : जाधवांच्या विजयानंतरही महायुतीतील आमदारांवर टांगती तलवार

देशात ‘येथे’ ‘नोटा’ला सर्वाधिक मतदान

मध्यप्रदेशातील इंदूर मतदारसंघाने नोटा मतांच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक 218674 मतांसह एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील अंतिम निकालाने दर्शविले आहे. नोटा किंवा ‘वरीलपैकी एकही नाही’ हा पर्याय मतदान यंत्रावर उपलब्ध आहे. जो मतदारांना सर्व उमेदवारांना नकार दिल्याचे औपचारिकपणे व्यक्त करू देतो.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!