महाराष्ट्र

Amol Mitkari : महायुती अर्थमंत्री म्हणून दादांपेक्षा कोणीच सक्षम नाही 

NCP Stand : आमदार अमोल मिटकरी यांचे विधान 

Portfolio Distribution : महायुतीच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांच्यापेक्षा दुसरा सक्षम नेता नाही. अजित पवार अर्थमंत्री असतील तरच महाराष्ट्र राज्याला आर्थिक शिस्त लागू शकते. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं असेल तर सरकारलाही काही अर्थ नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

आमदार अमोल मिटकरी यांच्या बोलण्यातून महायुतीमध्ये अजित पवार सोडले तर सद्य:स्थितीमध्ये एकही नेता अर्थमंत्री पदासाठी पात्र नाही असा अर्थ निघत आहे. त्यामुळे अजित दादांना खुश करण्याच्या नादात पुन्हा एकदा अमोल मिटकरी यांनीच महायुती मधील अन्य नेत्यांच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या बिनखात्याचे मंत्री आहेत.

लवकरच विस्तार 

महायुती सरकारमध्ये शिवसेनेला गृह आणि महसूल विभाग पाहिजे आहे. भारतीय जनता पार्टी गृह विभाग शिवसेनेला देणार नाही, हे जवळपास निश्चित झालं आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांना अर्थ खाते मिळणार नाही, असं कोणतंही अधिकृत विधान महायुती मधील कोणत्याही नेत्यांना केलेले नाही. त्यानंतरही आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा महायुतीमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

राज्यामध्ये महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर अजित पवार हे उपमुख्यमंत्री झालेत. त्यांना अर्थ खात्याचा पदभार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवला. निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली. याशिवाय अनेक महामंडळाची घोषणा देखील अजित पवार यांनी केली. अर्थसंकल्पानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरामध्ये अजित पवार यांचे वेगळ्या पद्धतीने ‘प्रोजेक्शन’ केले.

राजकीय रणनीती कार नरेश अरोरा यांच्या सल्ल्याने अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला गुलाबी लुक दिला. लाडक्या बहिणींचे दादा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांचा व्यापक प्रचार केला. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळालं. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदासाठी तयार झालेले अजित पवार हे सगळ्यात पहिले नेते होते. आताही अजित पवार आणि भाजपमध्ये खाते वाटपावरून कोणताही मतभेद दिसत नाही.

Winter Assembly Session : अधिवेशन काळात आठ हजार पोलिसांचा वेढा 

या सगळ्यात आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांना अर्थ खाते मिळाले पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यांची ही मागणी संयुक्तिक असली तरी त्यांनी दादांना खुश करण्याच्या नादामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी मधील सक्षम नसल्याचे विधान करून टाकले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!