महाराष्ट्र

Pune Porsche Accident : भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्याकडेच दिली चौकशी 

Sassoon Hospital : रुग्णालयाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन 

Pune hit and run case : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात भ्रष्टाचार आणि दबावामुळे हे प्रकरण देशभर गाजत आहे. यामध्ये दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहे. पुणे गुन्हे शाखा पोलिसांनी या प्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना सोमवारी अटक केली. तर सायंकाळ पर्यंत रुग्णालयातील आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. अमित घटकांबळे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. यानंतर ससून रुग्णालयातील गैरप्रकारा संबंधी चौकशीसाठी एसआयटी समिती स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एसआयटी समितीच्या अध्यक्षावरच भ्रष्टाचाराचा आरोप असल्याचे समोर आलं आहे.

पुणे पोर्शे अपघात प्रकरणात ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणी आणि उपचारासंदर्भात झालेल्या गैरप्रकारासाठी एसआयटी समिती गठीत करण्यात आली आहे. या एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे आहेत. याशिवाय, समितीमध्ये डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्याऩ, एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यामुळे एसआयटी समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

Anil Thatte : या ज्योतिषाने वाढवले महाविकास आघाडीचे टेन्शन !

डॉ.सापळेंवर भ्रष्टाचाराचा आरोप

डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील एसआयटी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. पल्लवी सापळे या ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे. हॉस्पिटल रुग्णालयाच्या अधिष्ठाता आहेत. जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांचे आरोप आहेत. त्यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना तसेच आता जे.जे. रुग्णालयात अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी केला होता. जे.जे. रुग्णालयात औषध, यंत्रसामग्री खरेदीच्या बिलांवर 5 ते 10 टक्के कमिशन घेतल्याशिवाय सह्या करत नाहीत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. हा मुद्दा विधानसभेत सुद्धा चर्चेत होता.

आरोप प्रत्यारोपाच्या फैरी

डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आरोप करण्यात आले होते की, डॉ. सापळे भाड्याची गाडी वापरतात आणि महिन्याला त्याच एक लाख रुपयांचे बिल शासनाला सादर करतात. हा खर्च 70 ते 80 लाख रुपये आहे. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तसंक्रमण शास्त्र विभागात असताना रक्तातील प्लाझ्मा विकून शासनाच्या परवानगीशिवाय त्यांनी 13 लाख रुपये जमा केले. या पैशातून रुग्णवाहिका खरेदी करून ती आईने दान दिल्याचं सांगितलं. असे आरोप डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!