प्रशासन

Eknath Shinde : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार?

ST Bus : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली आंदोलनाची दखल

Strike : वेतनाच्या प्रमुख मुद्द्यासह राज्यात पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अनेक ठिकाणी एसटी बससेवेला याचा मोठा फटका बसला आहे. लालपरीची चाके थांबल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनाची दखल घेतली आहे. 4 सप्टेंबर रोजी एसटीच्या कृती समितीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान या बैठकीत तोडगा निघतो का याकडे एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. 

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही वेतन लागू करा या प्रमुख मागणीसह इतरही मागण्यांसाठी 3 सप्टेंबरपासून राज्यात अनेक ठिकाणी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने राज्यभरातील चाकरमान्यांसह एसटी प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. तर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसह आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, अशी मागणी एसटी कर्मचारी कृती समितीकडून करण्यात आली आहे. राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.

एसटी कर्मचारी संपावर असल्याने लालपरीची चाकं थांबली आहे. संपाची हाक दिल्याने बसेस आगारातच उभ्या आहेत. अकोला, मुंबई, कल्याण, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, गुहागर, छत्रपती संभाजीनगर या बस अनेक प्रवासी बस सेवेअभावी अडकून पडले आहेत. दरम्यान या आंदोलनाची आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल घेतली आहे. 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सातवाजता बैठक घेणार आहे. कामगार संघटनांच्या कृती समितीची एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात एसटी प्रवाशांची कोणतीही गैरसोय होईल, अशी कृती करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!