Jalgaon District : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध कामासाठी एसटी बसेस आरक्षित केल्या होत्या. त्यातून जळगाव जिल्ह्यात 51 लाख रुपये निवडणूक विभागाकडून एसटी महामंडळाला द्यावे लागणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळ लखपती होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या जळगाव आणि रावेर या दोन जागांसाठी मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी, बॅलेट युनिट, बॅलेट मशीन, कंट्रोल युनिट पोहोचण्वयासाठी 392 बसेसचा वापर करण्यात आला. यासाठी जवळपास 51 लाख रुपये निवडणूक शाखेला एसटी महामंडळाला द्यावे लागणार आहे.
Goregav Tahsildar : तहसीलदारांची ‘जेलवारी’ गावकऱ्यांवर पडली भारी
जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान झाले. याबाबत जिल्हा निवडणूक शाखेचे अधिकारी अरविंद अंतर्लीकर म्हणाले, 392 बसेसचे नियोजन केले होते.
1593 वाहनांची सोय
मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचारी व मतदान साहित्याची वाहतूक करण्यासाठी जिल्ह्यात 1593 वाहनांची सोय करण्यात आली होती. वाहनांमध्ये 392 एसटी बसेस, मिनी बस 12, जीप 23, टेम्पो 14 सीटर 8, टेम्पो 20 सीटर 11, क्रुझर 475, स्कूल बसेस 70, एसओ जीप 416, ईव्हीएम वाहतूक वाहन 66, आचार संहिता उल्लंघन कक्ष वाहने 66,राखीव वाहने 66 अशा 1593 वाहनांची सोय करण्यात आली होती.