Shivsena : शांतीगिरी महाराजांनी आशीर्वाद द्यावे. त्यांनी महायुती सरकारला आशीर्वाद देणे अपेक्षित आहे. याउलट ते निवडणुकीस उभे राहिले आहेत. त्यांचा आम्ही पूर्ण आदर करतो. मात्र, त्यांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. नाशिकला काल त्यांनी साधु संतांशी संवाद साधला. त्यांचे आशीर्वाद घेतले त्यावेळी ते बोलत होते.
साधू समाज, मुख्य आखाड्याचा पाठिंबा
यावेळी समस्त साधू समाज व मुख्य आखाडा यांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृतार्थता व्यक्त केली. यामुळे महायुतीला बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
Rahul Gandhi : अदानी, अंबानी नाही गरीब कुटुंबांना लखपती बनविणार
धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे
धार्मिक अधिष्ठान राजकीय अधिष्ठानापेक्षा नेहमी मोठे राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्राला थोर परंपरा लाभलेली आहे. साधुसंतांच्या सानिध्यात काही वेळ राहते आले. आत्मिक बळ वाढीसाठी निश्चित लाभ होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या नेतृत्वात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.