महाराष्ट्र

Teachers Day : ‘आदर्श’ पुरस्कारांकडे शिक्षकांची पाठ!

Gondia : 18 पुरस्कारांसाठी फक्त 11 प्रस्ताव प्राप्त

गोंदिया जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाकडून शिक्षक दिनानिमित्त जिल्हा शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा 5 सप्टेंबरला होत आहे. या सोहळ्यात विद्यार्थी व शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात 18 पुरस्कारांसाठी फक्त 11 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. जिल्हास्तरीय ‘आदर्श’ पुरस्काराकडे ‘आदर्श’शिक्षकांनी पाठ फिरविल्याची चर्चा रंगायला लागली आहे.

शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाकडून शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जिल्हास्तरावर जिल्ह्यातील 18 शिक्षकांना दरवर्षी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान केला जातो. यासाठी प्रस्ताव मागविण्यात येतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून या पुरस्काराकडे शिक्षकांनी पाठ फिरविली आहे. यंदा माध्यमिक विभागाच्या 8 पुरस्कारासाठी 1 तर प्राथमिक विभागाच्या व इतर 2 पुरस्कारांसाठी फक्त 10 प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.

प्राथमिक स्तरावर पंचायत समितीनिहाय 1 असे एकूण 8, माध्यमिक स्तरावर 8 व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार व विशेष शिक्षक पुरस्कार अशा एकूण 18 पुरस्कारांसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावातून शिक्षकांची निवड केली जाते. मात्र या वर्षी गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांनी दरवर्षी प्रमाणे जिल्हास्तरीय पुरस्काराकडे पाठ फिरविली आहे. माध्यमिक विभागाकडून आमगाव तालुक्यातून एकमेव प्रस्ताव प्राप्त झाला तर प्राथमिक विभागातून एक तालुका वगळता इतर 7 तालुक्यांतून 10 शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून प्राप्त 18 पैकी 2 पुरस्कार नामंजूर करण्यात आले. तर इतर सर्व प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

11 प्रस्ताव आले, 11 मंजूर

गोंदिया जिल्हा परिषदकडे एकूण 11 प्रस्ताव आले होते. या पैकी 10 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. 1 प्रस्ताव नामंजूर झाला. जिल्हा निवड समितीने जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड केली आहे. प्राथमिक विभागातून गोंदिया तालुक्यातील संदीप सोमवंशी, तिरोडा तालुक्यातील हिवराज रहांगडाले, गोरेगाव तालुक्यातील दिनेश उके, आमगाव तालुक्यातून सुरेंद्र मेंढे, सालेकसा तालुक्यातून खुमेशप्रसाद कटरे, अर्जुनी मोरगाव तालुक्यातून सुरेंद्र भैसारे व देवरी तालुक्यातील सुशिला भेलावे, माध्यमिक विभागातून आमगाव तालुक्यातील इवेंद्र निनावे, विशेष शिक्षक पुरस्कारासाठी सरीता घोरमारे यांची निवड करण्यात आली आहे.

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष पंकज रहांगडाले तर उ‌द्घाटक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मृगानंथम, मुख्य अतिथी उपाध्यक्ष यशवंत गणवीर, प्रमुख अतिथी सभापती संजय टेंभरे, सविता पुराम, रुपेश कुथे, पूजा सेठ यासह स्थायी समिती व शिक्षण समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!