देश / विदेश

PM Oath Ceremony : काहींनी केले अभिवादन, काहींनी गडकरींना टाळले

Nitin Gadkari : शपथविधी सोहळ्यादरम्यान दिसले ‘स्ट्राँग अॅन्ड फिट’

National Politics : लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 9) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर अनेक खासदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यातील काहींनी शपथ घेतल्यानंतर पहिल्याच रांगेत बसलेल्या नेत्यांना अभिवादन केले. परंतु अनेकांचे हे अभिवादन केवळ अमित शाह यांच्यापर्यंतच मर्यादीत राहिले. काही नव्या मंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अभिवादन करण्याचे टाळले. त्यांच्याकडून हे कृत्य अनावधानाने झाले की जाणीवपूर्वक याची चर्चा मात्र रंगली.

शपथविधी सोहळ्यात नितीन गडकरी हे पहिल्याच रांगेत बसले होते. नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह यांचा क्रमांक होता. त्यानंतर अमित शाह होते. चवथ्याच खुर्चीवर नितीन गडकरी होते. त्यानंतरही काहींचे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीन गडकरी यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवले. यात अनेक तरुण मंत्र्यांचाही समावेश होता. राष्ट्रपतींनी शपथ दिल्यानंतर मंत्री शासकीय पुस्तकावर स्वाक्षरी करीत होते. त्यानंतर आपल्या जागेवर जाण्यापूर्वी ते पंतप्रधानांसह काही ज्येष्ठ नेत्यांना अभिवादन करीत होते. मात्र हे अभीवादन बहुतांश मंत्र्यांनी अमित शाह यांच्या पुरते मर्यादीत ठेवल्याचे दिसून आले.

चवथ्याच क्रमांकावर होते गडकरी

पंतप्रधान मोदी बसलेल्या रांगेतच चवथ्या आसनावर नितीन गडकरी बसून होते. मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री मात्र केवळ अमित शाह यांच्यापर्यंत जाऊनच अभिवादन करीत होते. अनेक ज्येष्ठ नेत्यांनाही गडकरी दिसले नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला. तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेवर आल्यापासूनच गडकरी यांचे मंत्रालय चर्चेत आहे. एनडीएमधील एका पक्षाला गडकरी यांच्याकडे असलेले दळणवळण मंत्रालय हवे आहे. गडकरी यांनी मोदी सरकारच्या दोन ‘टर्म’मध्ये सर्वाधिक विकासकामे केली आहेत. त्यांच्या विभागाने केलेल्या अनेक कामांमुळे जागतिक विक्रमही झाला आहे.

PM Oath Ceremony : मोदी नंतर मोटाभाई नव्हे राजनाथ सिंह यांना शपथ

स्वबळावर विजय

गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीत स्वबळावर विजय मिळविल्याचे सर्वत्र बोलले जाते. त्यांचे मताधिक्य पाहता हा विजय त्यांनी विकासाच्या जोरावर मिळविल्याचेचे दिसत आहे. शपथविधी सोहळ्यात गडकरी यांनी चवथ्या क्रमांकावर पद व गोपनियतेची शपथ घेतली. संपूर्ण शपथविधी सोहळ्यात ते ‘स्ट्राँग अॅन्ड फिट’ दिसत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात मंत्री असतानाही बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले. केंद्रातही त्यांनी याच विभागाचे मंत्री म्हणून विक्रमी विकासकामे केली. त्यामुळेच त्यांना ‘रोडकरी’ अशा नावानेही संबोधले जाते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!