महाराष्ट्र

Vidhan Sabha : ‘मी कुणाकडे जागा मागणार नाही’ : राज ठाकरे

Raj Thackeray विधानसभा निवडणुकीत लढणार 'इतक्या' जागा

Political News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. आघाडी, युती आणि जागावाटपावर चर्चाही सुरू झाली आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेने संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीत 200 ते 225 जागा लढण्याची घोषणा करण्यात येणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनासाठी मनसेने विधानसभेसाठीची ही पहिली घोषणा केली आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत मनसेची राज्यव्यापी बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता विधानसभेच्या तयारीला लागली आहे. मनसे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. महायुतीत मनसेला 20 जागा मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी बैठकीत मोठा निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान या बैठकीत लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना मराठी माणसाने मतदान केले नसल्याचे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सांगितले. तसेच विधानसभेसाठी मनसेची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याची माहिती देखील राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये दिली. ‘मी कुणाकडे जागा मागणार नाही’, असे स्पष्टपणे राज ठाकरे यांनी बैठकीमध्ये स्पष्ट केले. महायुतीसोबत जाणार की नाही? यावर मनसेचा निर्णय अद्याप झालेला नाही.

Nagpur Blast : स्फोटानंतर गडकरींचीही संवेधनशीलता; जल्लोष रद्द

महायुती, महाविकास आघाडी की महाराष्ट्र हिताचे निर्णय घेणारी ‘मनसे’?

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महायुतीसोबत राहून आगामी विधानसभा निवडणूक लढवू शकते. अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. तशी चर्चाही सुरू झाली होती. तर महायुतीत मनसेला किती जागा मिळणार याबाबतही बातम्या समोर आल्या होत्या. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीत 200 ते 225 जागा लढण्याची घोषणा करण्यात येणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनासाठी मनसेने विधानसभेसाठीची ही पहिली घोषणा केली आहे. मनसेच्या सोशल मीडियावर पेजवर देखील एक पोस्ट टाकण्यात आली आहे. त्यामध्ये 20 सीट मनसे लढणार अशा बातम्या चालविण्यात आल्या. पण आता मनसेने थेट 250 जागांवर दावा केलाय… आता खरी मजा येणार… महायुती, महाविकास आघाडी की महाराष्ट्र हिताचे निर्णय घेणारी ‘मनसे’ अशी पोस्ट टाकण्यात आली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!