महाराष्ट्र

Akola News : धक्कादायक! शिक्षकाने केला सहा मुलींचा लैंगिक छळ

Molestation Case : बदलापूरनंतर अकोल्यात संतापजनक प्रकार; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

कोलकाता नंतर मुंबईतील बदलापूर येथील घटनेने संपूर्ण देश हादरला. बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाऱ्याच्या घटनेबद्दल संपात व्यक्त होत आहे. अशातच अकोल्यातही एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना घडली आहे. उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा घाणेरडा प्रकार घडला आहे.

मंगळवारी संध्याकाळी याप्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार विरुद्ध कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा शिक्षक वर्ग 8 वीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवायचा. गेल्या चार महिन्यांपासून शाळेतील मुलींचा छळ करत होता. विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवून वाईट स्पर्श करत होता. त्याच प्रमाणे त्यांच्याशी अश्लील गप्पाही मारायचा. अखेर आज पीडित विद्यार्थिनींनी याबाबत पालकांना सांगितल्यानंतर प्रमोदचे विकृत कृत्य उघडकीस आले. पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. तर सहा मुलींचे जबाब सुद्धा नोंदविण्यात आले. या प्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पालकांमध्ये रोष

जिल्हा परिषद शिक्षकाच्या या कृत्याने पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. पोलिसांनी लगेच यामध्ये अटक केल्यानंतर पालकांनी शांत भूमिका घेतली.

महिला शिक्षिकेला कळला प्रकार

शाळेतील एका महिला शिक्षिकेला हा प्रकार माहीती होताच तिने बाल कल्याण समितीच्या हेल्पलाइनला सांगितले. त्यानंतर चाइल्ड हेल्पलाइनने शाळेत हाऊसला कार्यक्रम घेऊन ‘गुड टच बॅड टच’ या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यामध्ये मुलींनी याबाबत शिक्षकेला सांगितले. त्यासोबतच बालकल्याण समितीच्या सदस्य प्रांजली मनोज जयस्वाल यांना सांगताच शिक्षक प्रमोद सरदारचा विकृत प्रकार समोर आला.

वर्गात करायचा मुलींशी चर्चा

दरम्यान आठव्या वर्गातील सर्व मुलांना बाहेर काढून मुलींनाच वर्गात बसवायचा व त्या मुलींसोबत लैंगिक विषयावर शिक्षक चर्चा करायचा. याबाबत महिला शिक्षकांसोबत या प्रकाराच्या कारणांविषयी तो बोलत नव्हता.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!