महाराष्ट्र

Assembly Election : तीन दिवस शाळांना सुटीचा आदेश

Education Department : निवडणुकीच्या कामकाजामुळे निर्णय

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान आहे. निवडणुकीच्या कामासाठी शाळांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी निवडणुकीच्या कामाकाजाचे प्रशिक्षणही होत आहे. बुधवारी (20 नोव्हेंबर) राज्यात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना 18 नोव्हेंबरपासूनच कामकाजात सक्रीय व्हावे लागणार आहे. त्यामुळं राज्यातील शाळांना 18 ते 20 नोव्हेंबरपर्यंत सुटी जाहीर करण्यात येणार आहे. मुख्याध्यापकांना आपल्यास्तरावरून सुटी जाहीर करता येईल. शालेय शिक्षण विभागानं हे आदेश काढले आहेत.

मतदान असल्यानं 18 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत सुटी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शालेय शिक्षण विभागाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला शिक्षण विभागानं मंजुरी दिली आहे. गरज भासल्यास मुख्याध्यापकांनी आपल्यास्तरावरून सुटी जाहीर करावी, अशी सूचना विभागाचे सचिव तुषार महाजन यांनी केकेली आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळं शाळांना सलग सहा दिवस सुटी मिळण्याची चिन्हे आहेत.

सलग सुट्या

निवडणुकीमुळं राज्यभरातील शाळांना सलग सहा दिवस सुटी मिळण्याचे संकेत आहेत. शुक्रवारी (15 नोव्हेंबर) गुरूनानक जयंतीनिमित्त सुटी आहे. शनिवारचा एक दिवस तेवढा मध्ये आहे. रविवार असल्याने 17 नोव्हेंबरला सुटी असेल. 18 ते 20 नोव्हेंबर पुन्हा शाळांना सुटी जाहीर होण्याची चिन्हे आहेत. तसं झाल्यास सलग सहा दिवस शाळांना सुटी राहणार आहे. प्रचारासाठी अवघे चार दिवस शिल्लक आहेत. प्रशासकीय यंत्रणाही मतदानाच्या दिवासाची वाट पाहात आहे. राज्यभरात 85 वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांना गृहमतदानाची सुविधा देण्यात येत आहे. त्या कामातही शिक्षक व्यस्त आहेत.

Praful Patel : शिक्षणाचं बाजारीकरण कधी होऊ दिलं नाही

निवडणुकीच्या कामामुळं 18 त 20 नोव्हेंबरपर्यंत शाळांचे वर्ग चालणे जवळपास अशक्यच आहे. त्यामुळं मतदान झाल्यानंतरच शाळा सुरू होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी अनेक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कर्तव्यांला शिक्षकांनी प्राधान्य द्यावं, असे आदेश आयोगाने दिले आहेत. अनेक शाळांमध्ये मतदान केंद्र आहेत. या शाळांमध्येही 18 पासून वर्ग होणार नाहीत असं दिसत आहे. निवडणुकीच्या काळात शिक्षकांसह सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. विशेष करून 18 ते 20 या काळात कोणालाही रजा देण्यात येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचार आणि शिगेला पोहोचला आहे.

error: Content is protected !!