महाराष्ट्र

Vanchit Bahujan Aghadi : उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यात पडद्यामागे चर्चा

Siddhart Mokle : वंचितच्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ

Hidden Agenda : विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. अशात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलेल्या एका दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर एकमेकांचे कट्टर वैरी झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरू आहेत. या दोघांची एक गुप्त भेट झाल्याचे सांगितले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनीही 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राजकीय चर्चांना उधाण आले आहे. वेगवेगळ्या राजकीय चर्चांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही गंभीर आरोप केला होता. आरक्षण कायमचं संपलं पाहिजे, या मुद्द्यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), उद्धव ठाकरेंची शिवसेना व भाजप हे चारही पक्ष एक आहेत, असे ते म्हणाले होते.

पडद्यामागे घडामोड

आता वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनीही नवीन दावा केला आहे. सिद्धार्थ मोकळे यांच्या दाव्यानुसार भाजप आणि ठाकरे गटात सध्या गुप्तपणे बोलणी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी 25 जुलैला दिल्लीतील 7-डी मोतीलाल मार्ग येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांची भेट घेतली.

दिल्लीतील या भेटीनंतर दहा दिवसांनी म्हणजे 5 ऑगस्टला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी गेले होते. यावेळी ते एकटेच होते. फडणवीस हे स्वत: वाहन चालवत ‘मातोश्री’वर गेले होते. ‘मातोश्री’वर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात दोन तास बैठक झाली, असा दावा मोकळे यांनी केला आहे.

मोकळे यांच्या म्हणण्यानुसार संजय राऊत (Sanjay Raut) 25 जुलैला रात्री दोन वाजता दिल्लीत नड्डा यांना भेटले. त्यानंतर 5 ऑगस्टला रात्री 12 वाजता फडणवीस ‘मातोश्री’वर गेले. 6 ऑगस्टला ठाकरे दिल्लीला गेले. जाताना ठाकरे यांच्या सोबत कोण होते? दिल्लीला जाऊन ठाकरे कोणा कोणाला भेटले? भेटीत काय चर्चा झाली? हे राऊत आणि ठाकरे यांनी जाहीर करावं, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

Vanchit Bahujan Aghadi : पहिल्या यादीनंतर वंचितची निवडणूक समन्वय समिती!

भाजप आणि महायुतीमधील पक्ष हे काही आरक्षणवादी नाहीत. ते आरक्षणविरोधी आहेत. या सर्व पक्षांबद्दल जनतेला माहित आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आरक्षणवादी मतदारांनी मतदान केले. लोकसभा निवडणुकीत त्यांना मतदारांनी साथ दिली. पाच वर्षातील घडामोडी पाहता कोणतीही अनुचित राजकीय घटना घडली तर आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होणार आहे. ही फसवणूक होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघडी ही माहिती उघड करीत असल्याचे सिद्धार्थ मोकळे म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!