Buldhana : शिवसेना शिंदे गटाचे डॉ. संजय रायमुलकर यांना विधानसभा निवडणुकीत चारी मुंड्या चित करणारे मेहकरचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांच्या एका कृतीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. त्यांचा शपथग्रहण सोहळा सोमवारी (दि.10) पार पडला. या शपथ ग्रहण सोहळ्याला आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आमदार खरात यांनी स्वतः खमंग मेजवानी दिली. अगदी स्वयंपाक गृहात जाऊन भाजीला फोडणी देऊन पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना जेवायला घातले. त्यांची ही रुचकर मेजवानी अनेकांना भावली. याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले.
सिद्धार्थ खरात यांनी 8 डिसेंबरला विधानभवनात आमदारकीची शपथ घेतली. यावेळी कार्यकर्त्यांना सिद्धार्थ खरात यांचे नवे रूप पहायला मिळाले. मुंबईत आलेल्या कार्यकर्त्यांसाठी स्वतः खरात यांनी त्यांच्या हाताने जेवण बनवले. त्याचा व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
किलर
कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी झटत असतात. मेहकर-लोणार विधानसभा मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अभेद गडाला सुरुंग लावणारे सिद्धार्थ खरात यांचा जायंट किलर म्हणून उल्लेख होत आहे. यात सिद्धार्थ खरात यांनी शपथ घेतल्यानंतर सोबत आलेल्या कार्यकर्त्यांसाठी स्वतः स्वयंपाक गृह गाठले आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक करून त्यांना दोन घास भरवले. असा आमदार आता तरी दिसून आला नाही. परंतु सिद्धार्थ खरात यांनी आपल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची एक प्रकारे प्रतिष्ठा जपली आहे.
Sudhir Mungantiwar : सावरकरांच्या फोटोवरून संतापले मुनगंटीवार
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
आमदारकीची शपथ घेण्यासाठी सिद्धार्थ खरात मुंबईला गेले आहेत. त्यांच्यासोबत मेहकर मतदार संघातील कार्यकर्तेही आहेत. सिद्धार्थ खरात यांचे मुंबईत घर असून त्यांच्या पत्नी देखील प्रशासकीय अधिकारी आहेत. दरम्यान विधिमंडळाचे कामकाज आटोपल्यानंतर सिद्धार्थ खरात कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईतील घरी गेले. खरात यांच्या पत्नी नोकरीनिमित्त बाहेर असल्याने खरात यांनी स्वतःच्या हाताने कार्यकर्त्यांसाठी जेवण बनवले.
शिवसेनेचे मेहकर तालुकाप्रमुख निंबाजी पांडव यांच्या शेतातून सोबत नेलेली फुलगोबीची भाजी खरात यांनी बनवली. यावेळी स्वयंपाक बनवत असताना एका कार्यकर्त्याने खरात यांचा व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.