महाराष्ट्र

Lok Sabha Election : बोटाची शाई दाखवा अन कटिंग मोफत करा, अकोल्याच्या सलूनवाल्याचा उपक्रम

Akola Constituency : आगामी निवडणुकीत मतदान वाढण्यासाठी अनोखी शक्कल!

Akola News : आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे विविध पक्षांसह संघटनाही निवडणुकी साठी सज्ज झाल्या आहेत. प्रशासन देखील लोकशाहीच्या उत्सवासाठी सज्ज झालं आहे. अशातच अकोला येथील एका सलून वाल्याने अनोखी शक्कल काढली आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी या सलून वाल्याने मोफत कटिंग करून देणार असल्याचं म्हटलं आहे. मोफत कटिंग साठी फक्त अट एक आहे. मतदान केल्यानंतर बोटाला लावण्यात आलेली शाई दाखवा आणि मोफत कटिंग करा असा हा उपक्रम आहे. अकोल्यातील अनंत कौलकार यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. 

मतदार जनजागृती अभियानांतर्गत लोकशाही अधिक बळकट करण्याकरीता मतदानाची टक्केवारी अधिक वाढावी यासाठी अकोल्यातील सलून व्यावसायिक अनंता कौलकार यांच्यावतीने बोटाची शाटी दाखवा आणि मोफत कटिंग करा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लोकसभा आणि विधानसभा पोट निवडणुकीच्या अनुषंगाने नागरीकांमध्ये अधिकाधिक जनजागृती होवून त्यांनी मतदान करावे याकरीता रेल्वेस्थानक परीसरात असलेल्या अनंता कौलकर हेअर अँड ब्युटी सलुनमध्ये 26 एप्रिल रोजी बोटाची शाई दाखवा आणि मोफत कटिंग हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातून दिवसभर मतदान केलेल्या नागरीकांकरीता मोफत कटिंग करण्यात येणार आहे. मतदान करा आणि लोकशाही बळकट करा असा संदेशही ते यामाध्यमातून देत आहे. यापूर्वीसुध्दा अनंता कौलकर यांनी नोटबंदी, सर्जिकल स्ट्राइकवेळी मोफत कटींगचा उपक्रम राबविला आहे. आता या नव्या उपक्रमाची चर्चा अकोल्यात होत आहे.

निवडणुकीच्या दिवशी दिवसभर करणार मोफत कटिंग!

अनंत कौलकार हे आपल्या व्यवसायाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम देखील नेहमीच राबवित असतात. लोकशाहीचा मोठा उत्सव असल्याने या उत्सवात नागरिकांना जागृत करून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी 26 एप्रिल रोजी अकोल्यातील हेयर सलून मध्ये मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून तर मतदान प्रक्रिया बंद होईपर्यंत कौलकार हे मोफत कटिंग करून देणार आहेत. फक्त मोफत कटिंगचा लाभ घेण्यासाठी बोटाची शाई मतदाराला दाखवावी लागणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!