महाराष्ट्र

Shivendra Raje Bhosale : ‘अजिंक्यतारा’ किल्ल्याकडे लक्ष द्या!

Satara : शिवेंद्रराजे भोसले यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आवाहन

Ajinkyatara Fort  : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आज साताऱ्यात दाखल झाली. गड-किल्ल्यांचे संवर्धन सरकार करीत आहे. महाराजांच्या सहवासाने पावन झालेल्या वस्तूंचे जतन करीत आहे. अश्यात आमच्या अजिंक्यतारा किल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मिळून लक्ष द्यावे, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. 

शुक्रवारी (ता. 19) सातारा येथे शस्त्रांच्या कवायतीसह ‛शिवशस्त्रशौर्यगाथा’ हा दिमाखदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत वाघनखं दर्शनासाठी खुली करण्यात आली. यावेळी शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले, शंभुराज देसाई, नरेंद्र पाटील, महेश शिंदे, मकरंद पाटील, मकरंज गोरे, राजेंद्र राव, किशन शर्मा, वृषाली राजे, व्हिक्टोरिया संग्रहालयाचे निकोलस मर्चंट यांचीही उपस्थिती होती. लंडन येथील व्हिक्टोरिया अलबर्ट या संग्रहालयात असलेली वाघनखं सातारा येथे दर्शनासाठी खुली करण्यात आली.

शिवेंद्रराजे म्हणाले, ‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मुनगंटीवार यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. हा आपणा सर्वासाठी आयुष्यातील दुर्मिळ क्षण आहे. महाराजांचा इतिहास आजवर आपण वाचला, बघितला, पण हा अनुभवण्याचे भाग्य आज आपल्याला लाभले आहे. वाघनखं विधिवत खुली करण्यात आली आहेत.’

सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री तिघेही मुनगंटीवार यांच्या पाठिमागे भक्कमपणे उभे होते. त्यांच्यासोबत सातारा जिल्हा कालही उभा होता, आजही आहे आणि भविष्यातही राहणार, अशी ग्वाही देतो. साताऱ्यापेक्षा अनेक मोठी शहरं महाराष्ट्रात आहेत. पण हा सोहळा सातारा येथे होत आहे, त्याबद्दल सातारकर म्हणून आभार मानतो. अजित दादांचं साताऱ्यावर पहिलेपासून प्रेम आहे. मी त्यांच्यापासनं बाजुला गेलो होतो काही काळ, पण दादांचे प्रेम माझ्यावर कायम आहे, असेही ते म्हणाले.

10 कोटींनी पोट भरत नाही

आमच्या किरकोळ मागण्या असतात. १० कोटीत आमचं पोट भरत नाही. पण, आता तुम्ही अजिंक्याताराच्या पायथ्याशीच आले आहात. तुम्हा तिघांच्या उंचीचं काम अजिंक्यातारासाठी व्हावं, अशी अपेक्षा आहे. संवर्धनासाठी, पर्यटकांसाठी ते आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

Vikas Kharage : ही तर शिवभक्तांची स्वप्नपूर्ती!

तिजोरीची चावी दादांकडे, पण

‘गिरीश भाऊंनी आम्हाला मदत केली. रस्त्याची कामं केली. निम्मा रस्ता राहिला. आपण या सर्व कामांना मान्यता द्यावी. तिजोरीची चावी दादांकडे आहे. पण शिंदे फडणवीसांनी इशारा केल्यावरच ती तिजोरी उघडणार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

विरोधकांना विनंती

भोसले घराण्याच्या वतीने, उदयनराजेंच्या वतीने विनंती करतो विरोधकांना की महाराजांच्या वस्तुंना गालबोट लावण्याचे प्रयत्न करू नका. छत्रपतींचा इतिहास म्हटलं की कुठेतरी कमी लेखण्याचे काम केले जाते. मराराष्ट्रातील मराठी माणूसच हे करतो, याची खंत आहे. बाहेरच्या राज्यातून कुणी आक्षेप घेतला तर समजू शकतो. पण राज्यातीलच लोक असं करतात, त्याचं दुःख वाटते. वाघनखांच्या बाबतीत पसरवण्यात आलेल्या अफवांवर कुणीही विश्वास ठेऊ नये.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!