महाराष्ट्र

Raj Thackeray : राज ठाकरेंनी कुसुमाग्रजांच्या कवितेतून व्यक्त केला संताप !

Maharashtra Government : पुतळे आणि स्मारके ही केवळ राजकीय सोयीसाठी

Shivaji Maharaj statue issue : सिंधुदुर्गातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. नौदल दिनानिमित्त 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराजांच्या 28 फुटाच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. हा पुतळा सोमवारी 26 ऑगस्ट रोजी कोसळला. त्यानंतर राजकीय पक्षांसह जनसामान्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका करत कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले. या घटनेनंतर शिव प्रेमीमध्येही संतापाचे वातावरण आहे. विरोधी पक्षांकडून सरकारला टिकेचे लक्ष्य केले जात आहे. यात मागे राहतील ते राज ठाकरे कसले? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या घटनेनंतर सरकारवर तोफ डागली आहे. X वर कुसुमाग्रजांची कविता पोस्ट करून त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर (X) लिहिले आणि समाज माध्यमांवर पोस्ट केले. मालवणच्या राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची बातमी हृदयद्रावक आहे. 8 महिन्यांपूर्वी बांधलेली महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची मूर्ती अशी कशी कोसळली? मुळात पंतप्रधान ज्या पुतळ्याचे अनावरण करणार होते, त्याची पाहणी झाली की नाही? एवढेच नाही तर कुसुमाग्रजांच्या कवितेचा उल्लेख करून राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शिंदे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

मध्यरात्र उलटल्यावर

शहरातील पाच पुतळे

एका चौथऱ्यावर बसले

आणि टिपं गाळू लागले .

 

ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा.

शिवाजीराजे म्हणाले, मी फ़क्त मराठ़्यांचा.

आंबेडकर म्हणाले, मी फ़क्त बौद्धांचा.

टिळक उद़्गारले, मी तर फ़क्त, चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले ,

तरी तुम्ही भाग्यवान.

एकेक जातजमात तरी

तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र

फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

Shivaji Maharaj Statue : पुतळ्याच्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

केवळ राजकीय सोयीसाठी यांचे कारनामे..

पुतळे आणि स्मारके ही केवळ आपल्या राजकीय सोयीसाठी असल्याचे राज ठाकरे म्हणाले. महाराजांचे खरे स्मारक हे भव्य पुतळे नसून त्यांचे किल्ले आहेत, असे मी यापूर्वी अनेकदा सांगितले होते. महाराजांच्या नावावर राजकारण करणे, मते मागणे, स्मारकांसाठी निविदा काढणे आणि त्यातून काय निघते ते पहा.

लोकांनी प्रतीकांचे राजकारण करणारी व्यवस्था नष्ट केली पाहिजे. त्यानंतरच आपण शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असे म्हणता येईल. ते म्हणाले. टक्केवारी खाऊन तुम्ही छत्रपती शिवरायांचा पुतळाही निकृष्ट दर्जाचा उभा केलात, हे यावरून स्पष्ट झाले आहे. महायुती सरकारच्या खाबुगिरीचा हा उत्कृष्ट नमुना आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान या सरकारने केला आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले, मालवणमधील राजकोट किल्ल्यावर दुपारी एकच्या सुमारास पुतळा कोसळला. तज्ज्ञांकडून पुतळा कोसळण्यामागचे खरे कारण शोधून काढले जाईल, असे ते म्हणाले. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हे खरे आहे का? नक्की काय झाले? शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करत असल्याचेचित्र दिसत असल्याचेही ते म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!