महाराष्ट्र

Lok Sabha Election : ‘त्या’ वादानंतर शिवा मोहोड यांचा शिवसेनेत प्रवेश!

Shiv Sena : उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बांधले शिव बंधन

Lok Sabha Election : आमदार अमोल मिटकरी यांचे कट्टर विरोधक शिवा मोहोड यांनी अखेर शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी हा प्रवेश केला. मोहोड हे काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात गेल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील वाद चव्हाट्यावर आला होता. आमदार अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड यांच्यातील मतभेद पुन्हा उफाळून आल्याचं दिसून आलं होतं.

शिवा मोहोड यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड होताच अमोल मिटकरींनी वळसे पाटलांसमोरच मोहोड यांच्या नियुक्तीचा निषेध केला होता. तसेच आमदाराकीचा राजीनामा देण्याचीही धमकी दिली. त्यानंतर शिवा मोहोड हे पक्षात सक्रिय नव्हते. मात्र अखेर त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. अमरावती येथील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले.

Lok Sabha Election : मोदी सरकारने दहा वर्षांत देशाला सर्वाधिक लुटले

कोण आहेत शिवा मोहोड!

शिवसंग्राम पासून तर राष्ट्रवादी काँग्रेस पर्यंत राजकारण आणि समाजकारणात वेगळी छाप शिवा मोहोड यांनी पाडली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद सांभाळून महानगरपालिकेत नगरसेवक, सभापती,सभागृह नेता पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यांच्या पत्नी या कानशिवणी जिल्हा परिषद सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत.

आमदार मिटकरी आणि शिवा मोडोड यांचा नेमका वाद काय!

वर्षभरापूर्वी शिवा मोहोड यांनी आमदार अमोल मिटकरी हे कामासाठी कमिशन घेत असल्याचा थेट आरोप मूर्तिजापूर येथे एका कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्ष श्रेष्ठीं समोर केला होता. यासोबतच एका महिला पदाधिकाऱ्याचं काय प्रकरण आहे? असा सवाल मिटकरींना उद्देशून करण्यात आला होता. तर मिटकरींनी आरोप फेटाळत शिवा मोहोडांना सूचक इशारा दिला होता. अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड यांच्यातील वाद राज्यभरात गाजला होता. नंतर मिटकरी आणि मोहोड यांच्यातील वाद नवीन वळणावर पोहोचला. आमदार मिटकरींनी व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी आणि इतर व्हिडीओ व्हायरल होण्याची शक्यता लक्षात घेत अकोला सायबर पोलिसांत तक्रारही दिली होती.

दिलीप वळसे पाटलांसमोरच वाद चव्हाट्यावर!

आमदार अमोल मिटकरी यांचे कट्टर विरोधक शिवा मोहोड यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आमदार अमोल मिटकरी चांगलेच संतापले. त्यावेळी स्टेजवर दिलीप वळसे पाटील होते. त्यांच्यासमोरच अमोल मिटकरींनी या निवडीचा निषेध केला. अमोल मिटकरी म्हणाले की, “जोपर्यंत मला विश्वासात घेतलं जात नाही तोपर्यंत ही निवड मानली जाणार नाही. या निवडीचा मी निषेध व्यक्त करतो आणि त्याची तक्रार अजितदादांकडे केली जाईल.” असे म्हटले होते. शेवटी मोहोड यांनी वेगळी वाट धरली आणि ऊबाठा शिवसेनेत प्रवेश केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!