महाराष्ट्र

Akola: ठाकरे गटाच्या नेत्याला मोठा धक्का!

Shiv Sena : ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल वाद वाढला!

Atrocity : अकोल्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील सिटी कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.

भाजपच्या सरपंच डॉ. कल्पना पळसपगार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. त्यामुळे जिल्ह्यात भाजप-शिवसेना यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे. डॉ. कल्पना पळसपगार या अकोला जिल्ह्यातील हिंगणी बुजरूक येथील सरपंच आहेत. दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप कल्पना यांनी केला आहे. हिंगणी बुजरूक हे गोपाल दातकरांचे यांचे गाव आहे. भाजपने जाणीवपूर्वक या गुन्ह्यात आपल्याला अडकवल्याचा आरोप दातकर करीत आहेत.

अवघ्या काही महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुक होणार आहेत. अकोला पूर्व मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे दावेदार म्हणून दातकर यांचे नाव चर्चेत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज (दि. १३) पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. दातकर यांच्यावर गुन्हा दाखल का केला, याचा जाब त्यांनी विचारला. भाजपच्या एका आमदाराच्या दबावानं गुन्हा दाखल झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिवसेना आक्रमक

गोपाल दातकर यांच्यावर गुन्हा दाखल होताच अकोल्यात ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. आमदार नितीन देशमुख आणि शिवसेनाच्या पदधिकाऱ्यांनी अकोला पोलिस अधिक्षक कार्यालय गाठलं. आणि पोलीस अधिक्षकांकडे सखोल चौकशीची मागणी केली. भाजपच्या एका आमदाराच्या दबावानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात काही ऑडिओ क्लिप्स देखील हाती लागले आहेत, असेही देशमुख म्हटले. लवकरच भाजपचा तो आमदार सर्वांसमोर येईल, असा दावाही त्यांनी केला आहे

नेमके घडले काय?

11 जुलैला अकोला जिल्हा परिषदेत ही घटना घडली. गोपाल दातकर आणि आणि सरपंच डॉ. कल्पना यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. जिल्हा परिषद कार्यालयात मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर सरपंच महिलांनी पोलिसांत तक्रार केली.

Cotton : पांढऱ्या सोन्याला सुगीचे दिवस?

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे गोपाल दातकर यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार देशमुख यांनी सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केली आहे.

भाजप शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर!

निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिवसेना(उबाठा) असा वाद रंगण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असाच सामना होणार आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी शिवसेना ठाकरे गट सोडत नाही.अनेकदा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा काँग्रेसच्या उमेदवाराला मोठा फायदा झाला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!