महाराष्ट्र

Shiv Sena : मेहकरात अंबादास दानवे यांची तोफ धडाडणार!

Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाचा परिवर्तन मोर्चा गुरुवारी

शेतमालाला कवडीमोल भाव असल्याने खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे भाववाढ करावी, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरातील एमआयडीसीचा प्रश्न रखडला आहे. त्यामुळे बेरोजगारांना काम नाही. यासह जनहिताच्या विविध मागण्या घेऊन शिवसेना (ठाकरे) पक्ष परिवर्तन मोर्चा काढणार आहे. सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात गुरुवारी (3 ऑक्टोबर) मेहकरात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकेल. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची तोफ धडाडणार आहे.

शिवसेना (ठाकरे) आपला हक्काचा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी तयारीला लागले आहेत. त्यामुळे परिवर्तन मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सोयाबीनला ८ हजार रुपये प्रति क्विंटल, कपाशी व तुरीला १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. मेहकरातील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावावा. लोणार विकास आराखड्याची कामे पूर्ण करा. मंजूर घरकुलांचे थकीत अनुदान तात्काळ द्या. बेरोजगारांच्या हाताला काम द्या. मेहकर व लोणार तालुक्यातील पाणंद व शेतरस्ते ताबडतोब करून द्या. मेहकर व लोणार तालुक्यातील स्मशान व दफनभूमीच्या जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा. यासह इतर जनहिताच्या मागण्यांसाठी शिवसेना (ठाकरे) हा मोर्चा काढणार आहे.

यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख आशीष राहाटे यांसह जिल्हा संघटक, तालुकाप्रमुख शहरप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना तसेच विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मोर्चाची सुरूवात स्थानिक जानेफळ रोडवरील शिवसेना (ठाकरे) कार्यालय येथून सकाळी ११ वाजता होणार आहे. उपविभागीय अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येईल. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर स्थानिक स्वतंत्र मैदानावर जाहीर सभेत होणार आहे.

Prakash Ambedkar : आरक्षण संपविण्यासाठी चारही पक्ष एकत्र!

शेतकऱ्यांना आवाहन

परिवर्तन मोर्चाला मेहकर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर, कार्यकर्ते, शिवसैनिक, पदाधिकारी, बेरोजगार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्यांना वाचा फोडावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मोर्चा यशस्वी होण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहे.

शेतकऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर

राज्यभर आरक्षणांसाठी आंदोलनं होत असताना शेतकऱ्यांचाही मुद्दा ऐरणीवर आहे. अलीकडेच रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. आता शिवसेना ठाकरे गटानेही या आंदोलनात उडी घेतली आहे. त्यामुळे आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतात.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!