महाराष्ट्र

Shiv Sena : अकोल्यातील पराभवावर ठाकरे गटाचे मंथन

Akola Lok Sabha : सर्कलनिहाय झाली आढावा बैठक

Mahavikas Aghadi : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले. शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या अनुषंगाने सर्कलनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. यात मंथन करण्यात आले. बैठकीत पातूर आणि बाळापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सर्कलनिहाय चर्चा केली. सर्वांनी आपली भूमिका मांडली आहे. पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तयारीला लागण्याचे पक्षाकडून आदेश देण्यात आले आहेत. 

अकोला लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील पराभूत झालेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, गोपाल दातकर यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड शिवसेना उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, अकोला पश्चिम शहर प्रमुख राजेश मिश्रा, अकोला पूर्व शहर प्रमुख राहुल कराळे, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

Uttam Jankar : अजितदादांनी गुरंढोरं सांभाळावे

बैठकी अनेक विषयांवर चर्चा 

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पातूर आणि बाळापुर तालुक्यात झालेल्या मतदानावर विचार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शिवसेना आमदार नितीन देशमुख, गोपाल दातकर यांच्यासमोर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आढावा सादर केला. पक्षातील पदाधिकारी, सर्कल प्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते.

विधानसभा ताकदीने लढणार

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले. विधानसभा निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार असल्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीत केला. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केले. तरी नैतिकदृष्ट्या पराभव मान्य करत आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याचे निर्देश दिले आहेत.

पराभवावर मंथन

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेनेच्यावतीने यावर विचार मंथन केले गेले. या निवडणुकीत पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कठोर मेहनतीचे श्रेय आमदार नितीन देशमुख, गोपाल दातकर यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत होण्यासाठी जबाबदार कारणमीमांसाचा शोध घेतला जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!